
येळेगावमध्ये माजी सभापती आनंद कपाटे, कोंढ्यात पप्पु पाटील कोंढेकर, खैरगावात बालाजी गव्हाने तर मालेगावात स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. तर कामठ्यात माजी सभापती मंगला स्वामी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
अर्धापूर (जिल्हा परभणी) : तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी आपले गड राखले आहेत. येळेगावमध्ये माजी सभापती आनंद कपाटे, कोंढ्यात पप्पु पाटील कोंढेकर, खैरगावात बालाजी गव्हाने तर मालेगावात स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. तर कामठ्यात माजी सभापती मंगला स्वामी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील अर्धापूर तालुक्यात काही ग्रामपंचायतीचा अपवाद वगळता स्थानिक काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी आपले गड राखले आहेत. पण लहान ग्रामपंचायतीचा निकाल मात्र काॅग्रेसच्या पदाधिका-यांना विचार करण्यासारखा आहे. येळेगावात माजी सभापती आनंद कपाटे विजयी झाले तर कामठ्यात माजी सभापती मंगला स्वामी पराभूत झाल्या आहेत.
कामठ्यात यंदा सत्ता परिवर्तन झाले असून रणजितसिंग कामठेकर यांची दहा वर्षानंतर सत्ता आली आहे. त्यांच्या गटाला नऊ जागा तर शिवलिंग स्वामी यांच्या गटाला चार जगा मिळाल्या आहेत.
हेही वाचा - Gram Panchayat Result : अर्धापुरात धक्कादायक निकालांची परंपरा कायम, प्रस्थापीतांनी आपले गड राखले
कोंढ्यातील तिरंगी लढतीत यूवक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर यांच्या गटाला आठ जागा मिळाल्या आहेत. काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाने यांच्या गटाच्या चार जगा मिळाल्या आहेत. तालुक्याचे लक्ष लागलेल्या मालेगाव गावात स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. या आघाडीला नऊ , डाॅ लक्ष्मण इंगोले चार तर नागोराव इंगोले दोन जागा मिळाल्या आहेत.
पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच वसंतराव कल्याणकर यांच्या गटाला सहा, बालाजी कल्याणकर यांच्या गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. सावरगाव उध्दव आबादार यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या आहेत. दाभड ग्रामपंचायतीमध्ये सासूबाई रेखाबाई दादजवार विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले आहे. आंबेगात अमोल डोंगरे, भोगावमध्ये काशीराव हक्के, मेंढला खुर्दमध्ये दत्ता नवले यांना बहुमत मिळाले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे