तेलंगना व महाराष्टात दरोडे टाकणारा नांदेडमध्ये जेरबंद

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 17 June 2020

स्थानिक गन्हे शाखेच्या पथकानी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्याच्या मंगळवारी (ता. १६) सायंकाळी मुसक्या आवळल्या

नांदेड : तेलंगना व महाराष्ट्राच्या विविध भागात घरफोडी व दरोडे टाकणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गन्हे शाखेच्या पथकानी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्याच्या मंगळवारी (ता. १६) सायंकाळी मुसक्या आवळल्या. लक्ष्मण पिराजी मेटकर असे त्या चोरट्याचे नाव असून त्याच्यावर तेलंगना व नांदेडच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दरोडा व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. 

जिल्ह्यातील घडलेल्या चोरी, घरफोडी व माली गुन्ह्याची अकल करण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सुचना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाला कार्यरत केले. 

हेही वाचा सोशल माध्यमावर बदनामी करतोस काय ? म्हणून...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

श्री. भारती यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार जसवंतसिंग शाहु, अब्दुल रब, हवालदार मारोती तेलंग, सखाराम नवघरे, रुपेश दासरवाड, मोतिराम पवार, गणेश धुमाळ यांना घेऊन शहरात गस्त घालण्यास सुरवात केली. श्री. भारती यांना अट्टल चोरटा लक्ष्मण मेटकर रा. नांदूसा (ता. अर्धापूर) हा इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौफाळा परिसरात एका लग्न समारंभात हजर असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी सापळा लावून जीव धोक्यात घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र लक्ष्मण मेटकर याला पोलिसांनी आपणास घेरले याची चाहूल लागताच त्याने तेथून धूम ठोकली. 

पाठलाग करुन पकडले

लग्नसोहळ्यातून तो थेट नावघाट परिसरात गोदावरी नदी किनाऱ्याने पळाला. येवाळी पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला. अखेर त्याला अटक केली. त्याच्यावर तेलंगना राज्यातील निर्मल, नारायणखेड, कामारेड्डी, निझामाबाद आदी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दरोड्याचे १४ गुन्हे दाखल आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव, भाग्यनगर येथे १५ गुन्ह्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. नांदेड पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी तेलंगनातील कामारेड्डी (शहर) पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  

येथे क्लिक करा -  नांदेडच्या वजिराबादचे सात पोलिस क्वारंटाईन

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून पथकाचे कौतुक

तेलंगना व महाराष्ट्राच्या पोलिसांना गुंगारा देऊन दरोड्यासारख्या गुन्ह्यात पाहिजे असलेला अट्टल चोरटा लक्ष्मण मेटकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून तेलंगना पोलिसांच्या स्वाधीन केले. या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbers arrested in Telangana and Maharashtra nanded news