esakal | नांदेडच्या वजिराबादचे सात पोलिस क्वारंटाईन

बोलून बातमी शोधा

file photo

सात पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यावर पोलिस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 

नांदेडच्या वजिराबादचे सात पोलिस क्वारंटाईन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहराच्या वजिराबाद पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सात पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यावर पोलिस मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध देशभरात लॉकडाउन सुरू आहे. नांदेड शहरातही लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात तसा फारसा कोरोनाचा संसर्ग झाला नाही. मत्र मध्यंतर बाधीतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जवळपास तिनशेच्या आसपास रुग्ण संख्या पोहचल्याने प्रशासनही भांबावून गेले आहे. 

हेही वाचा -  ब्रेकींग : कोरोनाची पोलिस विभागात एन्ट्री, जिल्ह्यात एक पोलीस कोरोना बाधित

कोरोनाने आता थेट पोलीस विभागातच एन्ट्री 

आजपर्यत जिल्ह्यातील डॉक्टर, बँक कर्मचारी, रेशन दुकानदार, तहसील कार्यालय आदी विभागात पोहचलेला कोरोनाने आता थेट पोलीस विभागातच एन्ट्री केली आहे. जिल्ह्यातील पहिला पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या बाधीत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सात पोलिसांचेही स्वॅब घेण्यात येत असून त्यांनाही पोलिस मुख्यालयातील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ कोरोना बाधित
 
मंगळवारी प्राप्त झालेल्या कोरोना अवहालातून ही बाब पुढे आली आहे. बरकतपुरा भागातील एका महिलेला कोरोनाची लागन झाली आणि यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला होता. याच महिलेच्या संपर्कात आल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ कोरोना बाधित असल्याचे निष्पण झाले. तर काल मंगळवारी (ता. १७) प्राप्त अहवालात त्या महिलेचा दुसरा नातेवाईक तथा पोलीस कर्मचारी हा देखील कोरोना बाधित असल्याचे निष्पण झाले आहे. 

येथे क्लिक करानांदेडच्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा

बरकतपुरा परिसर सिल 

यामुळे हा कर्मचारी राहत असलेला बरकतपुरा परिसर सिल करण्यात आलाच आहे. मात्र आता शहरातील एक पोलिस ठाणेच कन्टेनमेंट झोन करण्याची वेळ प्रशासनावर आल्याचे बोलल्या जात आहे. तुर्त तरी पोलिस ठाण्याचे सॅनिटायझर करण्यात येत असून पोलिस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.