esakal | रोहित शर्मा, धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी! पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी उभारण्याबाबत धवल कुलकर्णी व पराग दहिवल यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी नुकतीच मुंबईत चर्चा केली.  

नांदेडला श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडीयम असून त्याचे २००८ पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम करण्याचे काम नांदेड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. 

रोहित शर्मा, धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी! पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक असून, या संदर्भात श्री. कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. एक) मुंबईत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला.


नांदेडला श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडीयम असून त्याचे २००८ पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम करण्याचे काम नांदेड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. या स्टेडीयमची उभारणी देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये झाली होती. आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या स्टेडीयमला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने येथे व्हावेत, या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे. त्या अंतर्गत सुरू असलेली अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. आता या ठिकाणी क्रिकेटचे सामने होत आहेत. 

हेही वाचा - हिंगोली तालुक्यातील आठ फेब्रुवारीपासून सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया

मुंबईत घेतली भेट
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व 'क्रिक किंगडम'चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. 

हेही वाचलेच पाहिजे - पाथरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहिर
 

अकादमीबाबत सकारात्मक चर्चा
धवल कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. धवल कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून पालकमंत्री अशोक चव्हाण यांना एक टी - शर्ट भेट दिले. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.

नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

स्टेडीयम होतेय सज्ज
दरम्यान, गोकुळनगर भागात रेल्वेस्थानकाजवळ महापालिकेचे श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडीयम असून हे स्टेडीयम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी ज्या ज्या सेवासुविधा देता येतील, ते देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या मैदान तयार झाले आहे. तसेच हिरवळही आहे. मैदानासाठी लागणारी यंत्रसामुग्रीही मागविण्यात आली आहे. पॅव्हेलियन आणि खेळाडूंसाठी खोली बांधकाम सुरू करण्यात आले आहे. नांदेड महापालिका आणि जिल्हा प्रशासन तसेच क्रीडा विभागातर्फे त्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.