esakal | जिद्दीला सलाम : विना रेमडेसिव्हिर, प्राणवायूचे प्रमाण 75 असतांना कपाटे यांनी केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर बातमी

जिद्दीला सलाम : विना रेमडेसिव्हिर, प्राणवायूचे प्रमाण 75 असतांना कपाटे यांनी केली कोरोनावर मात

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे. रुग्णालयात खाटा मिळणे अवघड झाले आहे. वैद्यकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे. शासकीय रुग्णालयात उपचार चांगले व वेळेवर मिळत नाही असा अनेकांचा अनुभव असला तरी सध्याच्या परिस्थितीत प्रचंड ताण असतांना देखील शासकीय रुग्णालयात रुग्ण बरे होत आहेत.

येळेगाव (ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड) येथील कपाटे यांना त्यांची प्रकृती पाहून खासगी रुग्णालयात दाखल करुन घेतले नव्हते. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कपाटे यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करून कपाटे यांचा प्राण वाचविला. विशेष म्हणजे रुग्णाला रेमडेसिव्हिर द्यावे लागले नाही. अशीच कोरोनावर मात अर्धापूर शहरातील कांताबाई विरकर यांनी शासकीय आयुर्वेद रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनार मात केली आहे. या दोन्ही रुग्णांना रेमडेसिव्हिरची गरज लागली नाही.

हेही वाचा - सेलूत साकारतेय शंभर बेडचे मोफत कोविड सेंटर- संभाजी ब्रिगेडचा पुढाकार

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत जशी वाढ होत आहे तसे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोनाच्या रुग्णाच्या रक्तात प्राणवायू किती आहे तसेच स्कोअर काय आहे यावर रुग्णाचा प्रकृतीचा अंदाज घेतला जात आहे. येहळेगाव येथील गोविंदराव गंगाराम कपाटे (वय 55) ह्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची टेस्ट केली असता स्कोर 17 व ऑक्सिजन लेव्हल 75 आली होते. घरातील कर्त्या व्यक्तीला या रोगाची बाधा झाल्याने कुटुंब घाबरून गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले पण डॉक्टरांनी रुग्ण वाचण्याची कमी शक्यता असून सर्वांना निरोप द्या असे सांगितले. पण त्यांचे पुतने छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी तातडीने हालचाली करुन शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन कपाटे यांचा प्राण वाचविला. काही दिवसाच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांची प्रकृती . पूर्ववत होत असून सध्या ऑक्सिजन लेव्हल 98 आहे.

आजपर्यंत माझ्या काकांनी केलेल्या पुण्याईचे फळ म्हणा किंवा माझ्या सामाजिक कार्याची मिळालेली पावती म्हणा त्यांची प्रकृती ठिक आहे. कोरोनाच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे आरोग्य कर्मचारी स्वतः चा जीव धोक्यात टाकून रुग्णांची जी सेवा, शुश्रुषा करत आहेत त्या बद्दल त्यांचे खरंच आभार मानले पाहिजे अशा भावना दशरथ कपाटे यांनी व्यक्त केल्या.

अर्धापूर शहरातील कांताबाई गोपीनाथ विरकर यांनी कोरोनाशी संघर्ष करित या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. त्यांच्या कुटूंबात तर चार व्यक्ती बाधीत होत्या. त्यांचे पती, दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कुटूंबात चार बाधीत असतांना न डगमगता त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यांचा स्कोर दहा होता. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील डाॅक्टरांनी उपचार करुन त्यांना बरे केले. तसेच रेमडेसिव्हिरची गरज लागली नाही. त्यांची प्रकृती ठिक झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आमच्या कुटूंबात आठपैकी चार जण बाधीत झाले होते. कुटूंबातील वातावरण चिंताग्रस्त झाले होते. पण सर्वांना धीर देवून योग्य ती काळजी, उपाययोजना करुन या महामारीवर मात केली आहे. कोरोना रुग्णाला धीर देवून उपचाराला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. या आजारावर मात करता येते अशी भावना पत्रकार गुणवंत विरकर यांनी व्यक्त केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top