नांदेडमधील एका लग्नाची अशीही गोष्ट, आरोप- प्रत्यारोपाने गाजली 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 19 August 2020

मात्र आपला राजकीय बळी घेण्याच्या प्रयत्नातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही बंटी लांडगे यांनी त्या प्रियकर व त्याच्या प्रियशीचे लग्न लावून दिले. मात्र याप्रकरणातील खरा शकुनीमामा रमेश गोडबोले असल्याचे आरोप केल्यानंतर श्री. गोडबोले यांनी यात माझा काय संबंध असल्याचे सांगितले.

नांदेड : प्रेमप्रकरणातून फसवणूक झाल्याचा आरोप करत काही महिन्यापुर्वी एका युवतीने आपल्या प्रियकरा विरोधात बलात्कार व फसवणूकीची तक्रार केली होती. या दरम्यान त्या प्रियकरासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांना सहआरोपी करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आपला राजकीय बळी घेण्याच्या प्रयत्नातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असतानाही बंटी लांडगे यांनी त्या प्रियकर व त्याच्या प्रियशीचे लग्न लावून दिले. मात्र याप्रकरणातील खरा शकुनीमामा रमेश गोडबोले असल्याचे आरोप केल्यानंतर श्री. गोडबोले यांनी यात माझा काय संबंध असल्याचे सांगितले. एका पिडीत युवतीला मदत केल्याचे समाधान असल्याचे रमेश गोडबोले यांनी सांगितले. 

बंटी लांडगे यांचे मित्र सचिन सिरसील्ला यांच्या विरोधात शहरातील एका युवतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लग्न करण्याचे आमीष दाखवून अत्याचार व फसवणूक केल्याची तक्रार दोन महिन्यापुर्वी केली होती. दरम्यान त्या पीडीत युवतीने प्रियकरासोबत सुत जुळवून देण्यापासून प्रियकराला पाठीशी घालून माझी फसवणूक करण्यात बंटी लांडगे यांचाच पुढाकार आहे, असे तक्रारीत म्हटले होते. यामुळे बंटी लांडगे यांना सहआरोपी करण्यात आले होते.  झालेल्या प्रकरणाची चौकशी करुन दोघांचा गैरसमज दुर करत लग्नाचा योग अखेर बंटी लांडगे यांनीच जुळवून आणला. या दरम्यान काँग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रतिनिधी रमेश गोडबोले यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. असा आरोप बंटी लांडगे यांनी दोन दिवसापूर्वी केला होता. 

हेही वाचा महाआघाडीतील खासदार व आमदारामध्ये पाण्यावरुन कलगीतुरा, कुठे ते वाचा...?

त्या’ प्रकरणात चोराच्या उलट्या बोंबा: मी सदैव न्यायाच्या बाजूनेच - रमेश गोडबोले

मागील अनेक वर्षापासून सातत्याने चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. मी मदेव सत्याच्या बाजूने असतो. मात्र राष्ट्रवादीचे बंटी लांडगे यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगितले. आरोपींनी चोराच्या उलट्या बोंबा ठोकत आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे रमेश गोडबोले यांनी आज सांगितले. 

माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र

एक महिन्यांपूर्वी शिवाजीनगर पोतिस ठाणे अंतर्गत एका प्रकरणात एका पीडित मुलीचे आई वडील व स्वतः मुलगी व त्यांचे काही नातलग त्यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. त्याबाबत पोलीस तक्रार घेत नसल्याची फिर्याद घेऊन माझ्याकडे आते होते. मी पीडीत मुलीला मदत केल्याने तिला न्याय मिळाला. पोलीसानी तपासाअंती त्या मुलीचा प्रियकर व त्याचा मित्र बंटी लांडगे विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने प्रियकर व त्याचा साथीदार यांना अटक केली. प्रियकर व त्याच्या साथीदारांनी लग्न करण्यास तयार असल्याचे सांगून पिडीत मुलीकडून शपथपत्र लिहून घेऊन न्यायालयात सादर केले. सदरील मुलगी व प्रियकर एकमेकासोबत लग्न करून आनंदी जीवन जगत असतील तर त्यात मला आनंदच आहे. मात्र माझी कुठतीही भूमिका नसताना केवळ राजकीय हव्यासापोटी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे श्री. गोडबोले यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The same thing happened with a marriage nanded news