‘या’ ठिकाणी कोरोनामुक्तीसाठी संकटमोचन महाआरती

प्रताप देशमुख
Monday, 31 August 2020


येथील युवक गणेश मंडळाच्या वतीने कोरोना संकट दूर व्हावे यासाठी संकटमोचन महासामूहिक महाआरती नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली असून, यावेळी श्रीगणेशाला साकडे घालून ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे.

बारड, (ता.मुदखेड, जि.नांदेड) ः येथील युवक गणेश मंडळाच्या वतीने कोरोना संकट दूर व्हावे यासाठी संकटमोचन महासामूहिक महाआरती नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली असून, यावेळी श्रीगणेशाला साकडे घालून ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला आहे.

आरोग्य स्वास्थ्यासाठी पुढाकार 
जय योगेश्वर, श्री बसवेश्वर तसेच श्रीराम गणेश मंडळ यांच्या वतीने कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे, तसेच प्रत्येक नागरिकांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी युवक गणेश मंडळाच्या वतीने रविवारी (ता.३०) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी उपसरपंच दिलीपराव कोरे, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष प्रभाकर भीमेवार, समाजसेवक गोकुळदास दाड, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त संजय मुलगे, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल आठवले, युवक काँग्रेस कार्यकर्ते बंटी कांबळे, योगेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन कनसेटे, बसवेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष कपिल कराळे, श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवाजी फुलारी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजाविधी गजानन स्वामी यांनी केला.

हेही वाचा -  नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर

 

सॅनिटायझरचे मोफत वाटप
कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी संकटमोचन महाआरती घेण्यात आली असून श्रीगणेशाला यावेळी साकडे घालण्यात आले. यावर्षी सर्वत्र कोरोना महामारीचे संकट असल्याने गावातील सर्व युवक गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने श्रीगणेशाची स्थापना करून या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाच्या लॉकडाउन नियमावलीचे पालन केले आहे. मोजक्या गणेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दररोज सकाळी व संध्याकाळी साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सचा वापर करून आरती केली जाते. गावपातळीवर गणेश मंडळ यांच्या वतीने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

यावेळी माध्यम समूहाचे प्रतिनिधी नामदेव बिचेवार, गोविंद लोणे, विठ्ठल राठोड, दादाराव गव्‍हाणे, विश्‍वंभर पुयड, नारायणराव देशमुख, शिरीष वानोळकर, गणपत लोमटे, नागेश पांचाळ यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जय योगेश्वर गणेश मंडळाचे ओम उपवार, दीपक उपवार, गजानन अनंतवार, केदार पवार, नवनाथ लोमटे, सिद्धेश्वर केशेवार, रंगराव लोमटे, आदित्य पांचाळ, बसवेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष कपिल कराळे, शुभम लाहेवार, संजय मुलंगे, सारंग मुलंगे, ओम मुलंगे, सौरभ कत्रे, शुभम उपवार, केदार मुलंगे, सोमेश लालमे यांच्यासह श्रीराम गणेश मंडळाचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sankatmochan Mahaarati For Corona At This Place, Nanded News