नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर

प्रल्हाद कांबळे
Sunday, 30 August 2020

महाविहार बावरीनगर येथे प्रत्येक पौर्णिमा श्रद्धावान उपासक - उपसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी होत असते. न्याय, नीती, सद्गूण, शील, सदाचार, विपश्यना, ध्यान, व्यसनमुक्ती, मैत्री भावना, ई. मानव कल्याणकारी मार्गांचा येथे सतत उपदेश केला जातो

नांदेड : महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे भाद्रपद पौर्णिमा,lता. दोन सप्टेंबर ते ता. 12 सप्टेंबरपर्यंत वर्षावासानिमित्त तृतीय श्रामणेर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

वर्षावास कालावधीमध्ये महाविहार बावरीनगर येथे तीन श्रामणेर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस आहे. पैकी आषाढी व श्रावण पौर्णिमेस आयोजित प्रथम व द्वितीय श्रामणेर प्रशिक्षण शिबीरात 100 च्या वर श्रद्धासंपन्न उपासकांनी सहभाग नोंदविला. जागेअभावी अनेकांना परतावे लागले. त्या सर्वांसह, उपासकांना श्रामणेर प्रशिक्षण शिबीरात सह्भागी होण्याची पुन:श्च संधी प्राप्त झाली आहे.

मानव कल्याणकारी मार्गांचा येथे सतत उपदेश

महाविहार बावरीनगर येथे प्रत्येक पौर्णिमा श्रद्धावान उपासक - उपसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी होत असते. न्याय, नीती, सद्गूण, शील, सदाचार, विपश्यना, ध्यान, व्यसनमुक्ती, मैत्री भावना, ई. मानव कल्याणकारी मार्गांचा येथे सतत उपदेश केला जातो.

हेही वाचा  दखेड केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत सीआरपीएफ खेलो इंडिया -

प्रमुख भिक्खु संघाचे प्रवचन

याच हेतुने सदर तीन महिन्याच्या कालावधीत महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधित बौद्ध धम्म संबंधी (संस्कार, संस्कृती) सखोल व गांभीर्यपूर्वक ज्ञान मिळविण्याची संधी उपासक उपासिकांना लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्रद्धेय भिक्खू धम्मसेवक महाथेरो, श्रद्धेय भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू पञ्ञारत्न थेरो, भिक्खू प्रज्ञानंद थेरो –नागपूर, भिक्खू संघपाल, भिक्खू शीलरत्न व पू. भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे.

उपासकांची covid-19 कोरोना तपासणी करूनच त्यांना प्रशिक्षणात सहभागी

संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत सह्भागी उपासकांना महाविहार बावरीनगर येथेच राह्णे अनिवार्य असेल, याची नोंद सहभागी होवू इच्छिणा-या उपासकांनी घ्यावी; तसेच श्रामणेर शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उपासकांची covid-19 कोरोना तपासणी करूनच त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे. 

येथे क्लिक करानांदेड दक्षिणमधील प्लॉटधारक का आहेत आत्मदहनाच्या तयारीत, वाचा सविस्तर -

महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांचे आवाहन

वय वर्षे 15 ते 30 दरम्यान असलेल्या उपासकांनी मोठ्या संख्येने श्रामणेर प्रशिक्षणात सहभागी होऊन धम्मदानाने लाभान्वित व्हावे व श्रामणेर प्राशिक्षण शिबीरात सहभागी होण्यासाठी दि. 01 सप्टेंबर 2020 पर्यंत भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो (8600844888, 9284031209) व भिक्खू संघपाल (9673361358) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Shramaner training camp at Mahavihar Bavrinagar on the occasion of rainy season nanded news