राज्यातील सरपंचांना मिळाला मोठा दिलासा....असे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

राज्य शासनाच्या ता. २९ मे च्या निर्णयामध्ये राज्यातील सरपंचांच्या विमा कवचाबद्दल काहीही उल्लेख नव्हता. त्या बद्दल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव, महिला अध्यक्ष राणी पाटील, महिलाराज्य उपाध्यक्ष अश्विनी थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती.

नांदेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सरपंचांना ५० लाख रुपयाचा विमा देण्यात यावा, अशी मागणी ता. २९ मे रोजी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा घडवून आणत शासनाने विमा मंजूर करण्याची मागणी केली होती. ती मान्य केल्यामुळे ५० लाख रुपयांच्या विमा कवचाचा फायदा राज्यातील सरपंचांना मिळणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष दासराव हंबर्डे यांनी दिली. 

शासन निर्णयात नव्हता उल्लेख
राज्य शासनाच्या ता. २९ मे च्या निर्णयामध्ये राज्यातील सरपंचांच्या विमा कवचाबद्दल काहीही उल्लेख नव्हता. त्या बद्दल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, प्रदेश सरचिटणीस विकास जाधव, महिला अध्यक्ष राणी पाटील, महिलाराज्य उपाध्यक्ष अश्विनी थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील सरपंचाना विमा कवच देण्याचे मान्य करण्यात आले. 

हेही वाचा.....नांदेडमधील दोन मंडळात अतिवृष्टी.....कुठे ते वाचा

सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित
सरपंच परिषदेचे अविनाश आव्हाड, जितेंद्र भोसले, शिवाजी मोरे, आनंद जाधव, राजाराम पोतनीस, गोविंद माकने, किसन जाधव, धनराज पाटील, गोविंद भवर, हनुमंत जाधव, कविता घोडके पाटील, शिरीष पाटील, रामराजे जाधव, आजिनाथ देशमुख, माऊली वायाळ, पांडुरंग नागरगोजे, सागर माने, सुधीर पठाडे, नारायण वणवे, संभाजी सरदेसाई, रणजीतसिंघ कामठेकर, गोपाळ पाटील इजळीकर, प्रकाश चितळकर, किसन जाधव, संजय सावंत, कमलेश कोरपे, कौसर जहागीरदार, आबासाहेब सोनवणे, अलंकार काकडे, राम पाटील, किशोर गणवीर यासह जिल्हा, तालुका पदाधिकारी, आजी माजी सरपंच यांचा समावेश होता.

हेही वाचलेच पाहिजे......नांदेड शहरातील वाहतुक सुरू, सिग्नल बंद

मुख्य सचिव काढणार आदेश 
ग्रामीण भागामध्ये सरपंच सध्याच्या कोरोनाच्या लढाईत उत्कृष्ट काम करीत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता कृती समिती अध्यक्ष म्हणून गावातील नागरिकांची काळजी आणि सुरक्षितता जपत आहे. त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे सामंत यांनी सांगीतले. सरपंचांच्या विमा कवचाबद्दल मुख्य सचिव अजोय मेहता हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार असल्याची माहिती सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) नांदेड जिल्हाध्यक्ष दासराव हंबर्डे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sarpanch of the state got a big relief .... read it like this