esakal | शनिवारी जिल्ह्यात १५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

शनिवारी (ता. पाच) स्वॅब तपासणीकरीता घेण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता. सहा) एक हजार ३१८ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार १६० निगेटिव्ह, १५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

शनिवारी जिल्ह्यात १५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, ९२ रुग्ण कोरोनामुक्त तर दिवसभरात १५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचे शनिवारी (ता. पाच) स्वॅब तपासणीकरीता घेण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता. सहा) एक हजार ३१८ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार १६० निगेटिव्ह, १५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ३०९ इतकी झाली आहे. 

हेही वाचा- कंधार : खचलेला बळीराजा पिकविम्याच्या प्रतीक्षेत

मृत्यू व्यक्तींची संख्या ६०५ वर 

देगलूर येथील सिद्धार्थनगरातील महिला (वय ६५) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ६०५ वर पोहचली आहे. 

हेही वाचा - नांदेड : राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यास उशिर

२३ जणांची प्रकृती गंभीर 

शुक्रवारी नांदेड महापालिका क्षेत्रात - ९८, नांदेड ग्रामीण - दोन, देगलूर - पाच, लोहा- तीन, मुदखेड -दोन, नायगाव - एक, धर्माबाद - तीन, बिलोली - दोन, किनवट - सात, उमरी - चार, हिमायतनगर - आठ, मुखेड - तीन, कंधार - एक, औरंगाबाद - एक, पुसद - दोन असे १५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४ हजार ३०९ इतकी झाली असून, सध्या ७८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी २३ जणांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत १७९ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २४ हजार ३०९ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २२ हजार ७०४ 
एकूण मृत्यू - ६०५ 
शनिवारी पॉझिटिव्ह - १५० 
शनिवारी कोरोनामुक्त - ९२ 
शनिवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - ७८५ 
गंभीर रुग्ण - २३ 
 

loading image