esakal | माठ विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत; काळ्या माठासह रंगीबेरंगी डिझाईनचे माठ नांदेडात

बोलून बातमी शोधा

नांदेड माठ बाजारपेठ
माठ विक्रेते ग्राहकांच्या प्रतिक्षेत; काळ्या माठासह रंगीबेरंगी डिझाईनचे माठ नांदेडात
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः उन्हाळा सुरु झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठांची खरेदी करतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडणे टाळत आहेत. परिणामी सध्या बाजारपेठेत माठ खरेदी मंदावल्याचे चित्र आहे.

गरीबांचा फ्रीज म्हणजे माठ. उन्हाळा सुरु झाला की बाजारात लाल आणि काळ्या रंगाचे माठ दिसू लागतात. त्यातच उन्हाळ्यात माठांची मागणीदेखील वाढते. परंतु, यंदा संचारबंदीमुळे नागरिक बाहेर पडत नसल्याने माठ विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षाच करावी लागत आहे. भुसा, माती, वाहतूकीचे दर वाढल्यामुळे माठांचे दरदेखील २० ते २२ टक्क्यांनी वाढले आहेत.

संचारबंदीमुळे माठ विक्री व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. दारोदारी भल्या मोठ्या कामठाच्या टोपलीत माठ विक्री करणारे देखील दिसेनासे झाले आहेत. वर्षभराच्या मेहनतीनंतर कुंभार व्यावसायिकांच्या माठाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नांदेड शहरात ठिकठिकाणी माठ विक्रीचे दुकानं पाहायला मिळत आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढलेला असतानाही गिऱ्हाईक नसल्याने खरेदी थंडावली आहे.

हेही वाचा - जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा येथील शंकर रुस्तुमराव राठोड (वय ३५ ) हा औरंगाबाद येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.

माठांच्या आकारानुसार किंमती गतवर्षी २०० ते ३०० रुपयांपर्यत असलेल्या माठांच्या किंमती यंदा २५० ते ३५० रुपयांच्या घरात पोहचली आहे. मोठा माठ गेल्यावर्षी ४०० ते ५५० रुपये होता यंदा तो ६०० ते ७०० रुपयाला विकला जात आहे. काळ्या माठाला सर्वाधिक पसंती असते. नळ असलेल्या माठांची किंमत थोडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. माठाच्या किंमती त्यांच्या आकारानुसार ठरवल्या जात असल्याचे मत विक्रेत्यांनी मांडले.

काय म्हणतात विक्रेते

पैसे फेडायचे कसे?

दिवसभर उन्हात बसून ५०० ते ६०० रुपयांचाही धंदा होत नाही. एकतर ग्राहक नाही व पोलीस सुद्धा आम्हाला बंद करा असे म्हणतात. व्यवसायासाठी गुंतवलेले भांडवल काढायचे कसे? सध्या उसनवारी करून पोट भरत आहोत. ते पैसे कसे फेडायचे? बायकोसह मुलाची व्यवसायात मदत होते. दरवर्षी जवळपास एक लाख रुपयाचा व्यवसाय होतो. त्यातून ३० ते ४० हजार रुपये नफा मिळतो.

- सुरेश यादव चक्रधर (माठ विक्रेते)

ग्राहक नसल्याने उपासमारीची वेळ

सहा वर्षापासून तरोडा नाका येथे माठ विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय करत आहे. संचारबंदीमुळे ग्राहक फिरकत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गुंतवणूक केलेले भांडवल कसे काढावे? हा मोठा प्रश्न पडला आहे. त्यात घरभाडे, प्रपंच, मुलांचे शिक्षण, संगोपन कसे करावे. चुडावा, पूर्णा हिंगोली येथून काळे माठ, नवीन डिझाईनचे आकर्षक माठ मध्यप्रदेश व सुरई, जाम हे आंध्रप्रदेश येथून आणतो.

- द्रोणागिरी रामा राजरवार (माठ विक्रेते)

संपादन- प्रल्हाद कांबळे