

SGGS Nanded Development Plan Focuses on 100 New Company Connections AI Courses Green Hydrogen and Clean Energy Research
esakal
नवीन नांदेड: श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेडच्या ‘व्हिजन २०३५’ ला गती देण्यासाठी जगभरातील माजी विद्यार्थी मैदानात उतरले आहेत. नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या ‘एसजीजीएस आयकॉन्स मीट २०२६’ मध्ये अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या देशांसह देशभरातील दिग्गज माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संस्थेच्या शैक्षणिक,संशोधनात्मक आणि औद्योगिक कायापालटासाठी ठोस कृतीचा संकल्प केला.संस्थेचे संचालक डॉ. मनेष कोकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या परिषदेत माजी विद्यार्थ्यांकडून २५८ प्रकारच्या योगदानाच्या कमिटमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.