

नांदेड : शक्तिपीठ महामार्ग हा जबरदस्तीने लोकांवर लादला जाणार नाही. तो विकासाकडे नेणारा महामार्ग आहे. विरोध असेल तर चर्चा करू, गरज पडल्यास आराखड्यात बदल करू. कोल्हापुरात विरोध होता, तेथे बायपास केला. लोकांच्या संमतीशिवाय हा मार्ग होणार नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता.६) पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.