esakal | सिडकोतील घरांचे प्रश्न शिवसेनेमुळेच सुटले; आमदार हंबर्डेंनी श्रेय घेऊ नये- अशोक उमरेकर
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक उमरेकर, महानगरप्रमुख, शिवसेना, नांदेड

सिडकोतील घरांचे प्रश्न शिवसेनेमुळेच सुटले; आमदार हंबर्डेंनी श्रेय घेऊ नये- अशोक उमरेकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सिडकोतील घरे मुळ घर मालकांच्या अनुउपस्थितीत हस्तांतरण करावे यासाठी सिडको येथील शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद उर्फ पप्पू मैड व सिडकोतील शिवसैनिकांनी गेल्या पाच वर्षापासून सतत पाठपुरावा केल्यामूळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुटले. परंतु हा प्रश्न सुटत असल्याचे दृष्टीपथास येत असतानाच नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे हे आयत्या वेळी श्रेय घेऊ नये असा टोला शिवसेनेचे महानगरप्रमुख अशोक उमरेकर यांनी लगावला आहे. आमदारांच्या श्रेयवादाबद्दल स्थानिक शिवसैनिकात नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील माजी शहरप्रमुख प्रमोद उर्फ पप्पू मैड हे २०१६ पासून सिडकोतील घरे मुळ घरमालकांच्या अनु उपस्थितीत थर्ड पार्टीच्या नावे करुन देण्यात यावीत. यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहेत. त्यात नांदेड सिडको कार्यालयास पहिले पञ एप्रिल २०१६ ला देऊन हा प्रश्न २००८ पुर्वी ज्याप्रमाणे सिडकोतील घरे हस्तांतरण होत होत होते. त्या पद्धतीने पुर्ववत मुळ घरमालकाच्या अनुउपस्थितीत लाऊन देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरु केले.

हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. लोकांमध्ये जागृती केली. परंतु त्यांचा विचार नांदेड बाजार समितीपर्यंत अद्यापही पोहोचला नाही.

त्यानंतर सिडको नांदेड कार्यालयास अनेक निवेदन दिले. स्वतः शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचेही पञ ता. आठ सप्टेंबर २०१९ व ता. १४ सप्टेंबर २०१९ रोजी अनुक्रमे सिडको नवी मुंबई व सिडको औरंगाबाद कार्यालयास देऊन हा प्रश्न लवकर सोडून सिडकोतील नागरीकांना न्याय द्यावा. अशी मागणी केली होती. तसेच प्रमोद मैड यांनी ता. २७ एप्रिल २०१६ व ता. २० जुलै २०१९ रोजी वरील कार्यालयास निवेदन देऊन त्या कार्यालयाचे लक्ष्य सिडकोतील घरांच्या प्रलंबीत प्रश्न सोडवावा म्हणून वेधले. हे सर्व शिवसेनेच्या माध्यमातून झाले असताना काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे हे आयत्या वेळी श्रेय घेत असल्याबद्दल शिवसैनिकात नाराजी व्यक्त केली जात आहे.