नायगांव नगरपंचायतमध्ये सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्यास शिवसेना स्वबळाचा नारा देणार- जिल्हाप्रमुख उमेश मुंडे 

file photo
file photo

नायगांव (जिल्हा नांदेड) : आगामी नायगांव नगरपंचायत निवडणूक संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी  शिवसेना पदधिका-यांसोबत एक महत्वाची बैठक घेऊन साधला संवाद. ही बैठक शहरप्रमुख माधव कल्याण यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी (ता. १३) रोजी पार पडली. यावेळी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन श्री. मुंडे यांनी केले. 

शिवसेना नायगाव शहरच्या वतीने नगरपंचायत निवडणूक संदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख माधव पा.कल्याण यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, तालुकाप्रमुख रवींद्र पा. भिलवंडे, कलाणे पाटील, ओमप्रकाश धुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केल्यानंतर प्रास्ताविकातून माधव कल्याण यांनी नायगाव नगरपंचायत निवडणुकीची एकंदरीत पार्श्वभूमी मांडली. तर अनेक शिवसैनिकांनी आपण नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत अशा सूचना जिल्हाप्रमुखांसमोर मांडल्या.

मुंडे बोलताना पुढे म्हणाले की, शिवसेनेचा कार्यकर्ता पैसा, जमीनवाला नसतानाही केवळ त्यांची धडपड व सामाजिक योगदान पाहूनच लोकांची मने तो जिंकतो, आता तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खंबीर नेतृत्व आपल्यासोबत आहे. माधव कल्याण सर्वांच्या मदतीला धावून गेल्यानेच त्यांना यापूर्वीही शहरवासीयांनी संधी दिली. आपण त्यांच्यासोबत व पक्षासोबत असल्याने शिवसेना पक्षही आपल्या बळकटीकरणासाठी सोबत असेल असे कार्यकर्त्यांना स्फूर्तीदायक विचार मुंडे यांनी मांडले. एवढेच नाही तर नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा नाही मिळाल्या तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार व नायगाव नगरपंचायतवर भगवा फडकविणार असा विश्वास श्री. मुंडे यांनी व्यक्त केला.

यावेळी शेरसिंग टाक, निशांत पवार, केशव खंडागळे, साईनाथ कल्याण, विशाल व्यवहारे, युवराज भद्रे, रितेश कल्याण, सचिन हनमंते, सचिन हनमंते, शंकर पाटील कल्याण, आकाश हनुमंते, हिंमत सिंग टाक, भूषण काळेवार, राम चितेंवाड, विश्वंभर बोयाळ, कैलास पवार, अक्षय राजकुंडल, गजानन कुंचलवार, अतुल  पांपटवार, सिताराम पवार, सूर्यकांत कुरे, निळकंठ हांडे, नारायण सूर्यवंशी, राजेश हटकर, नयुम शेख, प्रवीण हनुमंते यांची उपस्थिती होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com