
फुलवळ, (ता.कंधार, जि. नांदेड) ः जळकोट तालुक्यातील एकुरका येथील ७० वर्षांच्या एका आजीबाईंच्या अंत्यविधीसाठी कंधार तालुक्यातील मुंडेवाडी, (खंडोबाची वाडी) व गुट्टेवाडी, वाखरड, दैठणा येथील नातेवाईक गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून ते परत घरी पोहचले न पोहचले तोपर्यंत असा निरोप आला ती त्या मृत आजीबाईंचा कोरोना तपासणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याचे कळले. सदर माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेवडी येथे प्राप्त होताच फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी यांनी मुंडेवाडी व गुट्टेवाडी येथे भेट देऊन सविस्तर चौकशी करून मिळालेल्या माहितीनुसार येथील मुंडेवाडी २० तर गुट्टेवाडी येथील १५, दैठणा येथील ३ तर वाखरड येथील २ जणांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देऊन त्या ४० लोकांच्या हातावर क्वारंटाईन स्टॅम्प मारला असल्याचे आरोग्य कर्मचारी यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली.
भीतीचे वातावरण
कंधार तालुक्यातील मुंडेवाडी हे त्या आजीबाइंचे माहेर आणि एकुरका हे सासर गाव आणि गुट्टेवाडीत नातेवाईक असल्यामुळे अंत्यविधीसाठी माहेरचे म्हणजे मुंडेवाडी, गुट्टेवाडी, वाखरड, दैठणाचे अनेक महिला, पुरुष गेल्याचे सांगण्यात आले. अंत्यसंस्कार दरम्यान तेथे अनेकांचा एकमेकांशी जवळचा संपर्क आला. पण त्यावेळी सदर मयताच्या आजाराचे व निधनाचे कारण यापैकी कोणालाही माहीत नव्हते. अंत्यविधी उरकून माहेरची मंडळी परत गावाकडे पोहचली आणि काही वेळातच असा निरोप आला की मयत यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
३ लोकांची यादी प्राप्त
तेवढ्यात लगेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना निरोप आला की मुंडेवाडी आणि गुट्टेवाडीतील जे-जे लोक अंत्यविधीला गेले होते त्यांना तात्काळ सतर्क करा आणि सर्वांना क्वारंटाईनवर राहण्याचा सल्ला द्या असा निरोप मिळताच फुलवळ येथील आरोग्य उपकेंद्राचे कर्मचाऱ्यांनी मुंडेवाडी व गुट्टेवाडी, वाखरड, दैठणा येथे प्रत्यक्ष भेट देऊन जवळपास ४० जणांना क्वारंटाईनवर राहण्याचा सल्ला देऊन त्यांच्या हातावर स्टॅम्प मारल्याचे सदर आरोग्य कर्मचारी यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली. या वेळी गुट्टेवाडी येथील त्या १५, वाखरड येथील २, दैठणा येथील ३ लोकांची यादी प्राप्त झाली नव्हती.
सर्वत्र एकच खळबळ
सदर घटनेने मुंडेवाडी, गुट्टेवाडी, दैठणा, वाखरड सह फुलवळ व परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कंधार तालुक्यात आतापर्यंत तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने समाधानी असलेले लोक या मुंडेवाडी व गुट्टेवाडी येथील प्रकाराने भयभीत झाले असून येणाऱ्या काही दिवसानंतरच याचा परिणाम समोर येईल या भीतीने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.