Nanded News : अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्रलाभार्थ्यांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

पुरवठा विभागातर्फे नियोजन; जिल्ह्यासाठी साडेपाच लाख संच प्राप्त झाल्याची माहिती
nanded
nandedsakal

नांदेड : अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्डच्या माध्यमातून सहा वस्तूंचा समावेश असलेला ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यास पाच लाख ४८ हजार २८५ शिधाजिन्नस संच प्राप्त झाले आहेत.

राज्य शासनाने या पूर्वी दिवाळी, दसरा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वितरित केला होता. आता श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यासाठी पाच लाख ४८ हजार २८५ शिधाजिन्नस संच प्राप्त झाले असून हा आनंदाचा शिधा २२ जानेवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत वाटप करण्यात येणार आहे.

nanded
Nanded News : नांदेडला महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकरच उमेदवार ; आमदार विक्रम काळे : नांदेडला मेळावा

हा आनंदाचा शिधा अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच एपीएल (केसरी), शेतकरी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेबाबतची जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक यांनाही देण्यात आल्या आहेत.

सहा वस्तूंचा समावेश

-आनंदाचा शिधामध्ये सहा वस्तूंचा समावेश असून त्यामध्ये एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल आणि प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहा यांचा समावेश आहे. ई पॉज प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दरात लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com