MPSC Exam : आई-वडीलांचे स्वप्न मुलाने केले साकार ; शुभम वाठोरेचे ‘एमपीएसी’ राज्यसेवेत यश

घरची परिस्थिती तशी सर्वसामान्यच. आई - वडिलांना मुलाने अधिकारी व्हावे, अशी मनोमन इच्छा. त्यातूनच मुलाने देखील लहानपणापासूनच स्वप्न साकार होण्यासाठी धडपड सुरू केली. दहावी, बारावीत चांगले गुण मिळवून कानपूर येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि अभियंता झाला.
nanded
nandedsakal

नांदेड : घरची परिस्थिती तशी सर्वसामान्यच. आई - वडिलांना मुलाने अधिकारी व्हावे, अशी मनोमन इच्छा. त्यातूनच मुलाने देखील लहानपणापासूनच स्वप्न साकार होण्यासाठी धडपड सुरू केली. दहावी, बारावीत चांगले गुण मिळवून कानपूर येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि अभियंता झाला. त्यानंतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात तो राज्य सेवा आयोगाच्या परिक्षेत चौदावा आला आहे. त्याची निवड पोलीस उपअधीक्षक किंवा तहसीलदार म्हणून होणार आहे.

शहरालगत असलेल्या धनेगाव पंकजनगर येथील रहिवासी असलेल्या शुभम दादाराव वाठोरे याची आई प्राथमिक शिक्षिका आहे तर वडील खासगी नोकरी करतात. त्याचे मूळ गाव घोड्याचे कामठा (जि. हिंगोली) येथे आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण पंकज नगर येथील शाळेत झाले. त्यानंतर दहावी पीपल्स हायस्कूलमध्ये तर बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्याने आयआयटी कानपूर येथून इंजिनिअरींगची पदवी मिळवली.

nanded
MPSC Exam: राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर, विनायक पाटील राज्यातून प्रथम

पदवीचे २०२० मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचे ठरवले. त्यानुसार नांदेडला घरीच राहून त्याने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शुभमने कुठलीच खासगी शिकवणी लावली नाही. राज्यसेवा आयोगाच्या वतीने २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत त्याने पहिल्याच प्रयत्नात चौदावा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने स्वत: अभ्यास करत यश मिळवले आहे. शुभमने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आजी, आजोबा, आई कल्पना तसेच वडील, मामा व गुरूजन वर्गाला दिले आहे.

अभ्यासासाठी ‘त्रिसुत्री’ निश्चित

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना मी नियोजन केले आणि त्रिसुत्री निश्चित केली. केलेल्या अभ्यासाची पुन्हा पडताळणी, मागील काळात झालेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यावर भर दिला आणि अभ्यासक्रमाची माहिती घेऊन त्यानुसार अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाल्याचे शुभम वाठोरे याने सांगितले. तसेच इंटरनेट आणि यु ट्युबच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची मनोगते आणि स्पर्धा परिक्षेतील ज्येष्ठांचे मार्गदर्शनही घेतले. अभ्यासात सातत्य आणि जिद्द ठेऊन अभ्यास केला तर सर्वसामान्य कुटुंबांतील मुले देखील यश मिळवू शकतात. भविष्यात आपण अभ्यास सुरूच ठेवणार असून सध्या युपीएससी परिक्षेचा अभ्यास करत असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com