चाळणी झालेल्या मालाला आता कट्टी नाही

अनिल कदम
Saturday, 17 October 2020

देगाव येथील प्रयोगशील शेतकरी जीवन पाटील यांनी बाजार समितीचे प्रशासक कलेटवार यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर प्रशासकांनी तत्काळ व्यापाऱ्यांची बैठक बोलावून या प्रकरणी कठोर भूमिका घेतल्याने व्यापाऱ्यांना यातून माघार घ्यावी लागली. मागे काय झाले हे आता विसरा, मात्र यापुढे शेतकऱ्यांच्या चाळणी झालेल्या मालाला कट्टी लावता येणार नाही तसे आढळल्यास संबंधितांचा व्यापार परवाना रद्द करण्याचा इशारा कलेटवार यांनी देताच व्यापाऱ्यांनी एक दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवून हा प्रश्न पुढे रेटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र शेवटी नमते घेत त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. 

देगलूर, (जि. नांदेड) ः येथील कमिशन एजंटकडून शेतकऱ्यांच्या मालाला माल खरेदीच्या वेळी सरसकट ‘कटी’ लावण्याची पद्धत गेल्या कित्येक वर्षापासून सुरू होती. याकडे ना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने लक्ष घातले ना सहकार निबंधक कार्यालयाने, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट व्हायची. 

आवाहनाला प्रतिसाद 
देगाव येथील प्रयोगशील शेतकरी जीवन पाटील यांनी बाजार समितीचे प्रशासक कलेटवार यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर प्रशासकांनी तत्काळ व्यापाऱ्यांची बैठक बोलावून या प्रकरणी कठोर भूमिका घेतल्याने व्यापाऱ्यांना यातून माघार घ्यावी लागली. मागे काय झाले हे आता विसरा, मात्र यापुढे शेतकऱ्यांच्या चाळणी झालेल्या मालाला कट्टी लावता येणार नाही तसे आढळल्यास संबंधितांचा व्यापार परवाना रद्द करण्याचा इशारा कलेटवार यांनी देताच व्यापाऱ्यांनी एक दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवून हा प्रश्न पुढे रेटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र शेवटी नमते घेत त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. 

हेही वाचा -  उपचारानंतर नव्वद टक्के रुग्ण बरे, शनिवारी १९६ रुग्ण कोरोनामुक्त; चार बाधितांचा मृत्यू -

पिळवणूक मात्र थांबणार 
मराठवाड्यात कट्टी लावण्याची पद्धत कुठेही सुरू नसताना अगदी राजरोसपणे गेल्या कित्येक वर्षापासून देगलूरमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. यामधून करोडो रुपयांची उलाढाल होत होती. यापुढे मात्र या व्यवहाराला ‘चाप’ बसल्याने शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक मात्र थांबणार आहे. देगलूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात व्यापाराच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची गणली जाते, मोंढ्यात जवळपास १२० कमिशन एजंट कार्यरत आहेत. उपबाजारपेठ असणाऱ्या हनेगाव, शहापूर, तमलूर येथेही मालाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या मालाला प्रत क्विंटल दोन ते तीन किलो कट्टी लावण्याची पद्धत येथे प्रचलित झाली होती. 

व्यापारी असोसिएशन यांनी घेतला पुढाकार
येथील आडत व्यापारी असोसिएशनची नूतन कार्यकारिणी नुकतीच स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी श्रीनिवास मैलागीरे यांची तर उपाध्यक्षपदी भगवान पाटील चाकूरकर, सचिवपदी अशोक जुबरे, सहसचिवपदी अशोक वदेवार, कोषाध्यक्षपदी रणजीत पाटील हिंगोले यांची निवड केली गेली आहे. बाजार समितीचे प्रशासक कलेटवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यापुढे चाळणी झालेल्या मालाला कट्टी न लावण्याचा निर्णय घेत व न चाळणी झालेल्या मालाला कट्टी लावण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने जाहीर केला. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sifted Goods Are No Longer Cut, Nanded News