नांदेड : टीचभर पोटासाठी चिमुरडीची तारेवरची कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Small Child doing hard work for food nanded
नांदेड : टीचभर पोटासाठी चिमुरडीची तारेवरची कसरत

नांदेड : टीचभर पोटासाठी चिमुरडीची तारेवरची कसरत

नांदेड : शिक्षण, विकास आणि आधुनिकतेचा स्पर्श न झालेला कोल्हाटी समाज रस्त्याच्या कडेला पारंपरिक डोंबारी कला सादर करत नाच व खेळ याचा सुरेख संगम साधत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर कला सादर करून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाहत करत आहेत.

हेही वाचा: Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक केलेले निर्बंध प्रशासनाने काही प्रमाणात शिथिल केल्याने उपजीविकेसाठी अनेकजण घराबाहेर पडू लागले आहेत. वाजेगाव येथील सावित्रीबाई फुले हायस्कूलसमोर रस्त्याच्या कडेला डोंबाऱ्याचा खेळ दाखवून येणाऱ्याजाणाऱ्यांचे सात ते आठ वर्षांची मुलगी लक्ष वेधून घेतले. जमिनीपासून सहा ते सात फुटाच्या अंतरावर बांधलेल्या जाड दोरीवरून जेव्हा डोक्यावर पितळी कलश, हातात जाड बांबूची काठी घेऊन चालणारी ही मुलगी पाहून बघणारे थक्क झाले.

हेही वाचा: हे सरकार जनतेचं की, दारुड्यांचं? तृप्ती देसाई संतापल्या

उद्याची चिंता न करता घाम गाळून कला दाखवत लोकांचे मनोरंजन करून त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातून भाकरीचा चंद्र त्यांच्या ताटात दिसतो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. कोरोनामुळे घरबसल्या मुलांचे आॅनलाईन शिक्षण सगळीकडे सुरु आहेत. त्याच समाजात शिक्षणापासून वंचित असणाऱ्या या कोल्हाटी समाजातील ही चिमुरडी आपल्या कुटुंबासमवेत ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर कला दाखवत चौकाचौकात फिरत आहे. ना यांना राहण्यासाठी पक्की घरे, मुलांसाठी मोफत शिक्षण आणि सरकारी सुविधांचा अभाव. अविकासाच्या दारिद्र्यात लोटलेल्या जमातीपुढे आजही जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

काही कला आपसूकच केवळ उदरनिर्वाहाचं साधन ठरतात. कोल्हाटी समाजाचा ‘डोंबारी’ हा खेळ व नृत्यप्रकार या गटात मोडतो. वेडयावाकडया उडया मारत, दोरीवरच्या कसरती करून समोरच्यांची प्रशंसा करत पोटाची खळगी भरणं, या संकुचित मानसिकतेत गेली कित्येक वर्षे हा समाज खितपत पडलाय. विकास आणि आधुनिकतेचा स्पर्शही न झालेल्या या समाजाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- तुळशीराम पिंपरणे, मुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले हायस्कूल, वाजेगाव

Web Title: Small Child Doing Hard Work For Food Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top