...तर राजीनाम्याविषयी पुनर्विचार करावा

1sugar_20k.jpg
1sugar_20k.jpg


अर्धापूर, (जि. नांदेड) ः भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखानाच्या स्थापनेपासून सक्रिय आसलेले गणपतराव तिडके यांनी आपल्या राजीनाम्याविषयी पुनर्विचार करून राजीनामा मागे घ्यावा, असा दाबाव वाढत असून कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांची भेट घेऊन राजीनाम्याविषयी माहिती घेत आहेत. दरम्यान आपली प्रकृती साथ देत नसल्यामुळे राजीनामा दिला आहे, असे तिडके सांगत असले तरी राजीनामा देण्यामागे काही मोठे कारण आसावे, आशी कार्यकर्त्यांनध्ये चर्चा आहे. नांदेड जिल्हात एक यशस्वी उद्योग समूह म्हणून भाऊराव उद्योग समूहाचा उल्लेख करण्यात येतो. पण गेल्या काही वर्षांत साखर उद्योगातील चढ-उतार, वाढता खर्च यामुळे भाऊरावने दोन युनिट विक्रीस काढले असून वाघळवाडा कारखाना विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

हदगाव येथील कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. भाऊरावच्या उभारणीपासून गणपतराव तिडके यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. भाऊरावचे संस्थापक आध्यक्ष पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून गणपतराव तिडके यांची ओळख जिल्ह्यात आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जी जबाबदारी तिडके यांच्यावर टाकली ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. तिडके यांनी शस्त्रक्रिया झाली आसतांना निवडणुकीत सक्रिय होऊन प्रचार केल्याचे कार्यकर्त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी केवळ प्रकृती साथ देत नसल्यामुळे राजीनामा दिला आसावा, यावर पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा विश्वास बसत नाही. गेल्या दीड दशकापासून गणपतराव तिडके यांनी भाऊरावचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे. कारखान्याचा कारभार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केला. प्रत्येक निर्णय वरिष्ठांचा संमतीशिवाय घेतला नाही. पदाधिकारी, कार्यकर्ते यांची नाराजी अंगावर घेऊन त्यांनी काम केले. त्यांनी आचनकपणे राजीनामा दिल्याने अधिकारी, कर्मचारी, सभासद यांना धक्का बसला आहे.

सल्ला देण्याचे काम सल्लागारांवर 
त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, आसा दाबाव पदाधिकारी, कार्यकर्ते, संचालक, सभासद आणत आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक, आध्यक्ष यांना सल्ला देण्यासाठी एका सेवानिवृत्त कार्यकारी संचालकाची एका वर्षापूर्वी करण्यात आली आहे. कारखान्याबाबत काय धोरण आसावे, कोणते निर्णय घेण्यात यावे या बाबत सल्ला देण्याचे काम सल्लागारांवर आहे. या तिघांमुळे काही बिघाडा झाला आसावा, आशी कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. तर येणारी निवडणूक होईपर्यंत गणपतराव तिडके पदभार सांभाळतील व अशोक चव्हाण हे याकडे लक्ष घालतील, आशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com