esakal | ......म्हणून लहान शेतकरी आले अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

03.JPG

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने मार्च महिन्याच्या २३ तारखेपासुन लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे जनावरांचे बाजार बंदा आहेत. यात नायगाव, मुखेड, हळी-हंडरगुळी, अर्धापूर, उमरी, बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आदी ठिकाणचे बैल बाजार बंद आहेत.

......म्हणून लहान शेतकरी आले अडचणीत

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे लोकांची गर्दी होणारे सर्व व्यवहार बंद आहेत. यातच बैल बाजारही बंद असल्यामुळे पेरणी तोंडावर लहान शेतकरी अडचणीत आले आहेत. बैलांअभावी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणीपुर्व मशागतीचे कामे करावे लागत आहेत.

दहा लाख हेक्टरवर भौगोलीक क्षेत्र
दहा लाख ३३ हजार शंभर हेक्टर क्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात खरीपात जवळपास आठ लाख हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहेत. तर रब्बीत दोन लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात सात लाख ९६ हजार सहाशे शेतकरी आहेत. यात अल्प भुधारक शेतकरी तीन लाख आठ हजार १७३, अत्यल्प शेतकरी तीन हजार ४५ हजार ९०२ तर बहूभूधारक शेतकरी ८९ हजार ५१५ शेतकरी आहेत.    
   
हेही वाचा....होमिओपॅथिक औषधीने प्रतिकारशक्ती वाढविणे शक्य : डॉ. विजय शर्मा

दोन महिन्यापासून बैल बाजार बंद
पेरणीच्या पूर्वी दरवर्षी शेतकरी थकलेले तसेच कामाला चांगले नसलेल्या बैलांची बदलाबदल करतात. यावेळी पैशाची जळवाजुवळ अथवा शेतीमाल विक्रीवर पैसे दिले जातात. परंतु यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने मार्च महिन्याच्या २३ तारखेपासुन लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे जनावरांचे बाजार बंदा आहेत. यात नायगाव, मुखेड, हळी-हंडरगुळी, अर्धापूर, उमरी, बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आदी ठिकाणचे बैल बाजार बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांना बैल मिळेणासे झाले आहेत. 
  
हेही वाचलेच पाहिजे.....रुग्ण वाढल्याने महापालिका झाली खडबडून जागी...

लहान शेतकरी आले अडचणीत
जिल्ह्यात अत्यल्पभूधारकांची संख्या सर्वाधीक आहे. तीन लाख ४५ हजार शेतकरी एक हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले शेतकरी आहेत. अल्पभुधारकांची संख्याही तीन लाख आठ हजार आहे. यामुळे या शेतकऱ्यांना यंत्रांच्या सहायाने शेतकरी करणे परवडत नाही. अनेक छोटे शेतकरी एका बैलावरच शेती करतात. आपला एक बैल व दुसऱ्या एकाचा बैल अशी शेती करुन मशागतीसह पेरणीची कामे करुन घेतात. परंतु यंदा बैल बाजार बंद असल्यामुळे याचा सर्वाधीक फटका कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे.

यांत्रिकीकरणाव्दारे शेती मशागतीचे दर
(दर प्रती एकर प्रमाणे आहेत)
कामाचा प्रकार...............दर
वखरणी..............७०० ते १,०००
पंजी..................७०० ते १,०००
पलटी नांगर.......२,००० ते  २,२००
तिरी..................७०० ते १,०००
पेरणी..............१,००० ते १,२००
मोगडा.............१,००० ते १,२००
रोटावेटर...........१,८०० ते  २,०००
लेवलिंग............प्रती तास चारशे रुपये

मशागतीची कामे रेगांळली 
पेरणीच्या आधी नवीन बैल घेण्याचे काम अनेक शेतकरी करतात. परंतू यंदा बैल बाजार बंद असल्यामुळे मशागतीची कामे रेगांळली आहेत.
- चक्रधर पाटील,
वाका, ता. लोहा जि. नांदेड.

loading image
go to top