नांदेड जिल्ह्यासाठी लवकरच अद्ययावत वैद्यकीय संकुल - अशोक चव्हाण 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
Updated on: 

नांदेड - जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा मानस आहे. याचाच एक भाग असलेल्या दोनशे खाटांच्या नवीन हॉस्पिटलचे लोकार्पण करताना मला आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. सात) केले. 

नांदेडला श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील दोनशे खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी. टी. स्कॅन विभागाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दीक्षा धबाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी उपस्थित होते.

अद्ययावत वैद्यकीय सुविधांचे एकत्रित संकुल
नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इतर इमारती या अत्यंत जीर्ण झाल्या असून याचा कायापालट करणे आवश्यक झाले असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत सहाय्यभुत ठरणारे येथील नर्सींग कॉलेज व इतर विभागांना चांगल्या इमारतीची गरज आहे. हे लक्षात घेता आजच्या घडीला जिल्हा रुग्णालय परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर लवकरच अद्ययावत वैद्यकीय सुविधांचे एकत्रित संकुल लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. याठिकाणी सी. टी. स्कॅन विभागाचीही अत्यंत गरज होती. ती गरज लक्षात घेऊन या दोनशे खाटांच्या ओपीडीसह हा सी. टी. स्कॅन विभागही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वच्छता व निगाही आवश्यक
नवीन उभारण्यात आलेल्या या इमारतीची स्वच्छता व येथील उपकरणांची निगा ही तितक्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेतली पाहिजे. शासन जनतेच्या सुविधेसाठी चांगल्या वास्तू निर्माण करते. मात्र कालांतराने त्याठिकाणी स्वच्छता व निगा याबाबत फारशी काळजी घेतली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करुन या नवीन वास्तुच्या स्वच्छतेबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.       

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण 
कोरोना आपत्तीमुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करुन त्यांना जनतेच्या सेवेत तत्पर ठेवणे हे अतिशय महत्वाचे झाले आहे. यासाठी येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी ४१.५४ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पाच कोटी २८ लाख ६६ हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.  

नवीन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी
या नवीन दोनशे खाटांच्या रुग्णालयात प्राथमिक तपासणी, पॅथॉलॉजी विभाग, क्ष - किरण विभाग, ओपीडी, इंजेक्शन आणि ड्रेसिंग, डायलेसीस, औषध भांडार, महानगर ब्लड बँक, फिजिओ थेरपी, प्रतिक्षागृह आदी अद्ययावत वैद्यकीय सुविधा अंतर्भूत केल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचे आव्हान लक्षात घेता हे नवीन दोनशे खाटांचे रुग्णालय कोविडसाठी उपयोगात आणले जाणार आहे.    

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhaubeej Tragedy on Nanded Hyderabad Highway Young Man Crushed by Car Sister Attempts to End Her Life
MPSC State Services Result Nanded Candidate Omkesh Jadhav Secures 54th Rank After Six Attempts and Becomes Class One Officer
Nanded News Rohan Waghmare Rides Royal Enfield to Umling La in Ladakh Fulfilling His Childhood Dream With Family Support
Rameshwar Vyanjane transfer news