विशेष लोकअदालत : मोटार अपघातप्रकरणी सव्वादोन कोटीची तडजोड

प्रल्हाद कांबळे
Thursday, 22 October 2020

जिल्हा न्यायालयात बुधवारी (ता. २१) मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणाची लोकअदालत आयोजीत करण्यात आली होती. या अदालतीमध्ये दोन कोटी १४ लाखाच्या रक्कमेची तडजोड करण्यात आली.

नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात बुधवारी (ता. २१) मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणाची लोकअदालत आयोजीत करण्यात आली होती. या अदालतीमध्ये दोन कोटी १४ लाखाच्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. या माध्यमातून पिडीत कुटुंबाना आर्थीक मदत मिळवून देण्यास न्यायालयाने घेतलेला पुढाकार महत्वाचा ठरला. 

नांदेड येथील न्यायालयात बुधवारी (ता. २१) मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणाबाबतच्या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील लोकअदालत यशस्वी होण्यासाठी नांदेड येथील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकिल मंडळी तसेच पॅनल सदस्य व सर्व सन्माननिय विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. नांदेड येथे एकुण ४२ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली. दोन प्रकरणे अंशतः निकाली निघाली असून, रक्कम दोन कोटी ११ लाख ४३ हजार रूपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली.

हेही वाचा नांदेड- २०२ कोरोनामुक्त, १०३ पॉझिटिव्ह, दिवसभरात दोघांचा मृत्यू

कोरोनाच्या काळात अपघातग्रस्त कुटुंबियांना आधार

कोरोनाच्या काळात अपघातग्रस्त कुटुंबियांना न्यायालयाकडून मिळालेला हा आर्थीक लाभ अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत होता. ही विशेष लोकअदालत यशस्वी करण्याकरिता व जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्याकरिता प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप, जिल्हा न्यायाधीश (प्रथम) एस. एस. खरात, जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौतम तसेच जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले.

येथे क्लिक करा बॅंंकाची सुलतानी वसुली सुरुच; सरकारची संवेदनशिलता संपली- देवेंद्र फडणवीस

यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा- न्या. रोटे 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. एस. रोटे यांनी उपस्थित असलेल्या सर्व पक्षकार तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी वृंद व सदरील लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानुन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
                  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Lok Adalat: Compromise of Rs 12 crore in motor accident case nanded news