Nanded News : नांदेडला राज्यस्तरीय गणित अधिवेशन

परिसंवादासह व्याख्याने : गणित प्रश्नमंजूषा आणि सत्काराचेही आयोजन
nanded
nandedsakal

नांदेड : महाराष्ट्र गणित अध्यपक महामंडळाचे ४३ वे राज्यस्तरीय गणित अधिवेशन शनिवार (ता.२३) आणि रविवार (ता.२४) असे दोन दिवस होत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्‍घाटन होणार आहे.

अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ. गणेशराज सोनाळे, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुनील श्रीवास्तव अध्यक्षस्थानी राहतील. शनिवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता गणित अध्यापकांची नोंदणी, सकाळी दहा वाजता उद्‍घाटन, दुपारी बारा ते दीड रविंद्र येवले (फलटण) ‘गणित सर्वांसाठी’ या विषयावर व्याख्यान देतील. अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर मुंबरे (बार्शी) असतील. तसेच दुपारी अडीच ते साडेतीन डॉ. वेदप्रकाश मिश्रा (कराड) हे ‘गणिताचे तत्वज्ञान’ या विषयावर व्याख्यान देणार असून अध्यक्षस्थानी ना. ना. लामखेडे (जळगाव) असतील.

nanded
Nanded News : रब्बीसाठी पाच लाख अर्ज दाखल

रविवारी (ता.२४) सकाळी साडेनऊ वाजता राज्यस्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल. सकाळी अकरा वाजता आयआयटी पवई मुंबई येथील सुधीर घोरपडे हे ‘प्राचीन आणि आधुनिक गणितातील मनोरंजक कथा’ या विषयावर व्याख्यान देतील. अध्यक्षस्थानी विठ्ठल शिंदे (लातूर) राहतील. दुपारी साडेबारा वाजता ‘नवीन शैक्षणिक धोरणामुळे गणित

शिक्षणात होणारे बदल’ या विषयावर परिसंवाद होईल. यात सुवर्णा देशपांडे, हेमंत देशपांडे, डॉ. अरुण पाटील, प्रा. प्रभाकर उदगिरे, रवी वरे, बी. बी. कुलकर्णी सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता सत्कार समारंभ होईल. अध्यक्षस्थानी खासदार प्रताप पाटील चिखलीकर राहणार असून सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांचे मार्गदर्शन होईल.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत नागेश मोने (वाई) हे मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी विलास आंबोळे (कोल्हापूर) तसेच सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत आयआयटी खरगपूर येथील डॉ. मनेश कोकरे ‘एनईपी-२०२० च्या दृष्टीकोनातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताचे स्थान’ या विषयावर व्याख्यान देतील. अध्यक्षस्थानी मधुकर वीर (रायगड) राहतील. रात्री नऊ ते दहा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com