निरोगी राहण्यासाठी पोषण आहार आवश्यक, कसा ते वाचाच...  

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड ः उत्तम आरोग्यासाठी लागणाऱ्या पोषण आहाराचे महत्व पटावे आणि लोकांमध्ये आहाराविषयी जागृती व्हावी म्हणून भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय (एन. एन. डब्लु) च्या माध्यमातून दरवर्षी एक ते सात सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. देशातील जनतेच्या आरोग्याविषयी जनजागृती सोबतच लहान मुले, स्तनदा माता आणि मुली यांच्या आरोग्याची सुरक्षितता व योग्य पोषण आहार याच्या जनजागृतीसाठी हे अभियान राबविण्यात येते.  

राष्ट्रीय पोषण सप्ताह अमेरिका सोसायटीने सर्वप्रथम १९७३ साली सुरु केला. त्यास जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत गेला. या दरम्यान स्वातंत्र्यानंतर भारत देशातील आरोग्याची स्थिती फारशी समाधानकारक नव्हती. मृत्यूचे प्रमाण अधिक होते. सतत वाढणाऱ्या मृत्यूदरामुळे विकासाच्या बाबतीत देशाची पिछेहाट होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आणि १९८२ मध्ये भारत देशात संतुलित आहार अर्थात पोषण आहाराबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘खाद्य आणि पोषण’ विभागांतर्गत एक ते सात सप्टेंबर दरम्यान पोषण आहार सप्ताह साजरा करण्याचे निश्‍चित झाले. 

देशात २२ टक्के बालके कमी वजनचे 

ंतेंव्हापासून भारत देशात निरंतरपणे ‘पोषण आहार सप्ताह’ दिन साजरा केला जातो. यावर्षी पोषण आहार सप्ताहाची थीम ‘ईट राईट, बीट बाय बीट’ अर्थात ‘जेवताना अन्नाचा प्रत्येक कण पौष्टीक असला पाहिजे’ असा आहे. आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी शासनाने आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु केलल्या पोषण आहाराचा ३८ वर्षानंतर हेतू पूर्णपणे सफल झाला असे म्हणता येणार नाही. आजही  देशातील लहान मुले, स्त्रिया यांचे कुपोषण आणि ॲनेमिया सारख्या आजाराचे समुळ उच्चाटण झाले नाही. शरिरात लोहाचे प्रमाण कमी असल्याने भारतात जन्माला येणाऱ्या २२ टक्के बालकांचे वजन कमी असते.

आदिवासी भागातील स्त्रीयांमध्ये आजदेखील लोहाचे प्रमाण कमीच असल्याचे आढळुन येते. त्यामुळे ३६ टक्के स्त्रीयांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळुन येते. विशेष म्हणजे यामध्ये १५ ते १७ वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाण सरारीच्या तुलनेत २.७५ इतके तर ५६ टक्के मुली ह्या रक्ताक्षयाच्या आजाराने ग्रासलेल्या असून ग्रामीण भागातील स्त्रीयांमध्ये रक्ताक्षय आणि कुपोषण दिसून येते. 

गरजवंतांच्या दारापर्यंत शासनाची योजना जावी

ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील महिलांना आजही दोन वेळच्या जेवणासाठी झगडावे लागते. शासनस्तरावर राबविल्या जाणाऱ्या पोषण आहार सुविधा खालच्या स्तरातील आवश्‍यक समाज घटकापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचलेल्या नाहीत. म्हणून आज शहरी भागातील सुशिक्षित कुटुंबात आहाराविषयी जनजागृती झाली असली तरी, झोपडपटींमध्ये कुपोषीत माता, बालक आजही आढळुन येतात. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरावर स्त्री रुग्णालय सुरु केले आहे. कुपोषण बालकांची वार्डाच्या माध्यमातून स्तनादा माता व बाळ यांना १५ दिवसांपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवून त्यांच्या आहाराबद्दल खबरदारी घेतली जाते. मात्र ज्यांना रुग्णालयाची पायरीच माहित नाही त्या वाडी, वस्ती, तांड्यावरील गरजवंतापर्यंत शासनाची ही योजना घेउन संबंधित अधिकारी जातात का? हा मोठा प्रश्‍न आहे. 

कोरोनामुळे तर अवघ्या मानव जातीचे राहणीमान आणि जिवन पद्धतीच बदलुन गेली आहे. कोरोनाच्या भीतीने आज नाही म्हटले तरी, झोपडपट्टी, वाडी, वस्ती, तांड्यावरील व्यक्तींना देखील आहाराकडे जातीने लक्ष देणे गरजेचे वाटु लागले आहे. पण त्यांना आहाराच्या नियोजनाबद्दल सांगणार कोण? हा मोठा प्रश्‍न आहे. सामान्यातील सामन्य व्यक्तीचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी शासनाने गाव खेड्यातील अंगणवाडीतून खाऊ वाटप करुन जिम्मेदारी न झटकता ३८ वर्षानंतर पुन्हा पोषण आहार सप्ताहाचा वाडी, वस्ती, झोपडपटी, तांडे व आदिवासी बहुल भागात दारोदारी जाऊन नव्याने कुपोषणचा आढावा घेऊन सामान्य लोकांमध्ये आहाराबद्दल जागरुकता निर्माण करण्याची खरी गरज आहे.

व्हीटॅमिन ‘सी’ 
मानवी शरिरातील रोगप्रतिकार शक्तीच नव्हे तर त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी देखील व्हीटॅमिन ‘सी’ हे जिवनसत्व महत्वाचे असते.  पालक, लिंबु, संत्री, पेरु आवळा, पत्तकोबी, पपया, ब्रोकली, सिमला मिर्ची आणि टोमॅटो यातून हे जिवनसत्व मिळते.

कॅल्शीयम- 
लहान मुलांचे हाडे मजबुज करण्यासाठी शरिरात कॅल्शीयम महत्वाचे असते. ब्रोकली, दूध, पनीर व दूग्धजन्यपदार्थ यातून मोठ्या प्रमाणावर कॅल्शीयम मिळते.

फायबर- 
लहानापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना फायबरयुक्त अन्नाची गरज असते. फायबरमुळे पचनशक्ती सुरळीत होण्यास मदत होते. काकडी, गाजर, उसळ, सफरचंद, ओटस, बादाम, मुग,मटकी, चना यातून सर्वातजास्त फायबर मिळते.
-वर्षा बारसे (आहार तज्ज्ञ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com