esakal | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर आला एक मतप्रवाह, कोणता? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कोरोना विषाणूच्या पर्श्‍वभूमीवर देश लॉकडाउन केला. परिणामी अर्थकारण बिघडले, रोजी-रोटीचा प्रश्न ऐरणीवर आला. जनजीवनाची घडी सर्वत्रच विस्कटली आहे. नागरिकांच्या गरजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. एकंदरीतच जीवनशैलीतील बदलाव स्वीकारून पुढे जाणे हाच सध्यातरी एकमेव उपाय आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर आला एक मतप्रवाह, कोणता? ते वाचाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लाॅकडाउनने अख्ख जग ठप्प झालं आहे. हे जग अशा पद्धतीने थांबू शकतं असे कधीच कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. संपूर्ण जीवनशैली बदलायला लावणाऱ्या व आर्थिक पातळीसह सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या लाॅकडाउनने आता मात्र जनजीवन कमालीचे त्रस्त झाले आहे. नको हा लाॅकडाउन असा सूर आता नागरिकांमधून निघू लागला आहे. मात्र, त्याचवेळी एक मतप्रवाहही यानिमित्ताने समोर आला आहे. वर्षातून एकदा किमान १५ दिवस तरी कडकडीत लाॅकडाउन पाळावा, अशी संकल्पना काही नागरिकांमधून समोर येऊ पहात आहे.

लाॅकडाउन पडला आता अंगवळणीच
कोरोना विषाणुमुळे संपूर्ण देशाला लाॅकडाउनला सामोरे जावे लागले. भारतात महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात प्रथम लाॅकडाउन झाला. त्यानंतर पंजाब आणि उत्तराखंड असे करत देशभरात लाॅकडाउन जाहीर केले. लाॅकडाउन म्हणजे काय ः लाॅकडाउन म्हणजे लाॅकआऊट. लाॅकडाउन आपत्ती किंवा साथीच्या वेळी लागू केलेली आपत्कालीन यंत्रणा आहे. लाॅकडाउन केले गेले आहे त्या भागातील लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. त्यांना केवळ अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीच बाहेर येण्याची परवानगी असते. पाच टप्प्यातील हा लाॅकडाउन आता अंगवळणीच पडला आहे.

हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा पंधरावा बळी

लाॅकडाउनबाबत सर्वंकष विचार गरजेचा

  • कोणत्याही ठिकाणचा लाॅकडाउन उठवताना तो टप्प्याटप्प्याने उठवण्यात यावा. तो एकदम उठवला गेला तर कोरोना विषाणूची साथ पुन्हा पसरण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. अनेक देशांमध्ये लाॅकडाउनचे परिणाम सकारात्मक आल्याचे दिसून येत आहे आणि लोकही नव्या जगण्याच्या पद्धतीला आत्मसात करून घेण्याच्या मनःस्थितीत आहेत.
  • लाॅकडाउनने सारं जनजीवन बदलले आहे. अनेकांनी तर दरवर्षी किमान १५ दिवस तरी कडकडीत लाॅकडाउन असावा, असे मत व्यक्त केले आहे. त्याचे फायदे-तोटे काय आहेत, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असून त्यावर विचारमंथन होणेही गरजेचे आहे.
  • पर्यावरणावर लाॅकडाउनचा सकारात्मक परिणाम होत आहे. सध्या सर्वत्र बहुतांशी वाहतूक बंद असल्याने वायू प्रदूषण घटल्याने पर्यावरणाला पोषक वातावरण ठरत आहेत. असा दरवर्षीच्या या संभाव्य लाॅकडाउन संकल्पनेबाबत सर्वंकष विचार होणेही गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

संपर्क रोखण्यासाठी बंदी
स्वप्नजा देशपांडे (अशोकनगर) ः
कोरोनाने माणसाला बरंच काही शिकवलं. लाॅकडाउन काय असतं हे सामान्यांना नव्हे अनेकांना ज्ञातही नव्हतं. लाॅकडाउन परिस्थितीत लोकांची हालचाल रोखण्यासाठी व त्यांचा एकमेकांशी संपर्क तोडण्यासाठी सरकारने घातलेली बंदी म्हणजे लाॅकडाउन. असा याचा साधा सरळ अर्थ काढावा लागेल. ज्या ठिकाणी लाॅकडाउन केले आहे तेथील कोणतीही व्यक्ती घराबाहेर जाऊ शकत नाही. तो स्वतःला घरात कैद करतो. सरकार अत्यावश्यक सेवा म्हणून काही सवलतीही या काळात देवू शकते.

हे देखील वाचा - मुर्खाच्या नंदनवनात उधळलेले गाढव म्हणजे गोपीचंद पडळकर! कोण म्हणाले वाचा...

जगण्याची बद्धत बदलणे महत्त्वाचे
रमेश बाभळेकर (चैतन्यनगर) : 
 लाॅकडाउनमध्ये अनेकजण घरातून आॅफिसचे काम करत आहेत. त्यामुळे आपल्या जगण्याला ही सवय लावून घेतली पाहिजे. नवी आरोग्य व्यवस्था या निमित्ताने तयार केली पाहिजे. जोपर्यंत कोरोनावरचे निर्णायक असे औषध वा लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपण जगण्याची पद्धत बदलून घेणे महत्त्वाचे आहे, हे यानिमित्ताने अवघ्या जगासमोर आले आहे.