esakal | विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी शोधायला पाहिजे- डॉ. सुयश चव्हाण 

बोलून बातमी शोधा

file photo

"कौशल्य बलम" औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून भारतीय जर्मनमध्ये उच्च अधिकारी असणारे जर्मन स्थित डॉ. सुयश चव्हाण यांनी संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी शोधायला पाहिजे- डॉ. सुयश चव्हाण 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी शोधायला पाहिजे, आपल्या कामात व व्यवसायात तसेच अभ्यासात मन लावून परिश्रम घेतले तर नक्कीच आपणास त्याचा फायदा होतो. असे मत जर्मन येथील दूतावासातील अधिकारी असणारे डॉ. सुयश चव्हाण यांनी व्यक्त केले.

"कौशल्य बलम" औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून भारतीय जर्मनमध्ये उच्च अधिकारी असणारे जर्मन स्थित डॉ. सुयश चव्हाण यांनी संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एम. एस. बिरादार, उपप्राचार्य एस. एस. परघणे, प्रबंधक वाय. सी. राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शालेय व महाविद्यालयीन व तांत्रिक शिक्षण इयत्ता पाचवीपासूनच जर्मनीत सुरु केले जाते. Made in जर्मन याबाबत त्यांनी कॉलिटी यावर जर्मनीत भर दिला जातो. कोणत्याही उत्पादनाची किंमत कधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी केली जात नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या पाचमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनाचा सहभाग असतो. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कार्यक्रम अधिकारी एम. जी. कलंबरकर, पेंटर विभाग प्रमुख प्रकाश  बनाटे, स्टाफ क्लबच्या वतीने श्री राखा, श्री. केदार, संघटनेचे अध्यक्ष श्री. सोलेवाड, सोसायटीचे अध्यक्ष संजय आणेवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री  राखा यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत श्री बिरादार यांनी केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला दिन साजरा

नांदेड -औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्य बलम या सभागृहात जागतिक महिला दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. 

जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कलावती तूषांबाड यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती गहिरवाल,अँड. सुरेखा एडके संस्थेचे प्रबंधक यशोदा राठोड, प्राचार्य एम. एस. बिरादार, उपप्राचार्य सुभाष परघणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मोहन कलंबरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चर्चासत्रात महिला सक्षमीकरण व स्त्री शिक्षण, महिला आरोग्याबाबत जागरुकता व महिला विषयी कायदे या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अँड. सुरेखा एडके यांनी महिलांना कायद्याचे ज्ञान व्हावे याकरिता मार्गदर्शन केले उद्योजिका श्रीमती गहिरवाल यांनी आपले विचार मांडताना महिलांनी छंद बाळगून उद्योगाकडे वळावे असे प्रतिपादन केले. तसेच बचत गटाच्या प्रमुख श्रीमती पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजिका झालेल्या माजी विद्यार्थिनींचा यथोचित सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने स्युईंग टेक्नॉलॉजीच्या आशा माणिकराव मेत्रे, माया शंकरराव ढवळे, करजितकौर आत्मासिंग संधू, दीक्षा वाघमारे, शिवानी कपाटे तसेच बेसिक कॉस्मेटोलॉजि व्यवसायाच्या निशिगंधा ससाणे, मनीषा ढोले, सुजाता प्रकाश नागेश्वर, प्रियंका अरुतवार, जयश्री हरी राव, सुषमा हाडोळे, सुजाता शिरसे या यशस्वी उद्योजिका यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट निदेशक कविता दासवाड, शिल्प निदेशक संजीवनी जाधव, स्मिता गरुडकर, संगीता राठोड, प्रज्ञा निकम, वैशाली जाधव, पौर्णीमा हनमंते, प्रज्ञा भरणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी हनुमंतकर लक्ष्मी यांनी केले.