नासाडी टाळण्यासाठी शाळांमध्ये खिचडीऐवजी शिधा द्यावा 

प्रमोद चौधरी
Sunday, 18 October 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावरही पोषण आहाराचा कोरडा शिधा वितरित करण्याची मागणी पालक करत आहेत. 

नांदेड : पोषण आहाराच्या माध्यमातून शाळेकडून मिळणाऱ्या धान्याचा पुरेपूर उपयोग परिवारासाठी होत आहे. गोरगरीब पालकांच्या संसाराला त्यामुळे हातभार लागत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावरही पोषण आहाराचा कोरडा शिधा वितरित करण्याची मागणी पालक करत आहेत. 

शालेय पोषण आहारांतर्गत शाळांमधून दिली जाणारी खिचडी कोरोना काळात बंद झाली. त्याऐवजी तांदूळ, मूगडाळ व हरभरा असा कोरडा शिधा सध्या वितरण करण्यात येत आहे. त्याचे पालक व शाळा व्यवस्थापनाकडून स्वागत होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील तयार पोषण आहार व पूरक आहार बंद करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तयार आहाराऐवजी तांदूळ, मूगडाळ व हरभरा अशा धान्यादी मालाचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय, धंदे बंद पडले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांचे पालकही बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे कुटुंबियांचे पालनपोषण करण्याची समस्या त्यांना सतावत आहे. 

हेही वाचा - उपचारानंतर नव्वद टक्के रुग्ण बरे, शनिवारी १९६ रुग्ण कोरोनामुक्त; चार बाधितांचा मृत्यू

गैरव्यवहाराला पायबंद बसेल
अशावेळी पोषण आहाराच्या माध्यमातून शाळेकडून मिळणाऱ्या धान्याचा पुरेपूर उपयोग परिवारासाठी होत आहे. गोरगरीब पालकांच्या संसाराला त्यामुळे हातभार लागत आहे. शाळांसोबतच अंगणवाड्यांतीलही पोषण आहाराचा कोरडा शिधा वितरीत करण्याची मागणी पालक करत आहेत. त्याचबरोबर कोरडा शिधावाटपाचे शिक्षक व मुख्याध्यापकांकडूनही समर्थन होत आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी होणाऱ्या पोषण आहाराच्या काळ्या बाजारासह गैरव्यवहाराला पायबंद बसणार आहे. 

हे देखील वाचाच - नांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर

शिक्षकही होतील मुक्त 
अनेकदा खिचडी शिल्लक राहून वाया जाते. कोरडा शिधा विद्यार्थ्यांना दिलातर तेही आपोआप बंद होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही पोषण आहाराच्या खिचडीऐवजी कोरडा शिधा कायम वितरित करण्याची मागणी केली जात आहे. कोरडा शिधा घरी दिल्याने खिचडी शिजवण्यापासून वितरण करणे, शिल्लक खिचडीची विल्हेवाट लावणे, स्वच्छता करणे, भाजण्याचा धोका अशा अनेक समस्येतून विद्यार्थी व शिक्षक मुक्त होतील, असे मत शिक्षकांसह पालकांमधून व्यक्त होत आहे.

येथे क्लिक कराच - Video - माहूरगडावर श्री रेणुकादेवीची उत्साहात घटस्थापना

कशासाठी द्यावा कोरडा शिधा?
शाळेमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची शक्कल काढली. परंतु, स्वतंत्र व्यवस्था न करता शिक्षक, मुख्याध्यापकांनीच तो शिजविवा, असे आदेश दिल्या. त्याला आक्षेप घेतल्याने बचतगटांकडे त्याची जबाबदारी दिली. असे असले तरी, मुख्याध्यापक व शिक्षकांनीच हिशोब ठेवावा, असे सांगितल्याने अर्धा-अधिक वेळ हा कारकुनीमध्येच जातो आहे. परिणामि विद्यार्थ्यांच्या परिणामी शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आहे. त्यासाठी शाळेतच खिचडी न शिजवता कोरडा शिधा विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याचे पालक सांगतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students Should Be Given Dry Rations Instead Of khichdi Nanded News