esakal | Video : ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध वाहिन्यांद्वारे अभ्यासाचे धडे, कसे? ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वार्षिक परीक्षा न होता त्यांना आकारिक मूल्यमापनाच्या आधारे सरळ पुढील वर्गात प्रवेशित करण्याकरिता उत्तीर्ण करण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच एक मे रोजी मुलांना त्यांचे निकालपत्र मिळाले नाही.

Video : ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध वाहिन्यांद्वारे अभ्यासाचे धडे, कसे? ते वाचाच

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर १६ मार्चपासून शाळा बंद आहेत. आॅगस्टपर्यंत शाळा उघडण्याची चिन्हे दिसत नसल्याने, विद्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी खासगी शाळा आॅनलाइन अभ्यासाचे धडे देत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थीही मागे पडू नये, म्हणून जिल्हा परिषदेच्या काही तंत्रस्नेही शिक्षकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ हा उपक्रम सुरु केला आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लॉकडाउन असून १७ मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. अशा वातावरणात विद्यार्थी हे शाळा आणि औपचारिक शिक्षणापासून दुरावलेले आहेत. यातच त्यांच्या वार्षिक परीक्षा न होता त्यांना आकारिक मूल्यमापनाच्या आधारे सरळ पुढील वर्गात प्रवेशित करण्याकरिता उत्तीर्ण करण्यात आले आहे. यावर्षी पहिल्यांदाच एक मे रोजी मुलांना त्यांचे निकालपत्र मिळाले नाही.

हेही वाचा - नांदेडकरांना दिलासा - ५२ अहवाल आले निगेटिव्ह
 
त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी राज्यभर ‘शाळा नाही, शिक्षण आहे’ या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या-त्यांच्या इयत्तांचे शिक्षण मिळावे, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रप्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमांतर्गत ‘वर्क फ्रॉम होम’च्या दृष्टीने शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण कसे देता येईल? त्याचे वेळापत्रक, आराखडा कसा असावा? यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नांदेड तालुक्यातील वाजेगाव विभागातील सर्व शिक्षकांची ‘झूम’ ॲपद्वारे वेबिनार बैठक सोमवारी (ता.चार मे) झाली.  

असा आहे उपक्रम
जवळपास महिनाभरापासून सर्व शिक्षकांनी पालकांचे व्हाॕटस्अॕप ग्रुप तयार करून दररोज प्रश्नावली, गृहपाठ, स्वाध्याय, भाषिक खेळ याद्वारे अध्यापन चालू ठेवले आहे. ज्या पालकांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाही त्यांना सुद्धा फोनद्वारे संपर्क साधून आकाशवाणी व सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. ‘झुम’ ॲपद्वारे वेबिनारचे आयोजन करून संपूर्ण केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांना यासंदर्भात मार्गदर्शन दिले जात आहे. शासकीय व विविध आॕनलाईन व आॕफलाईन संसाधनांचा वापर करून प्रभावी अध्यापनाविषयी सूचना व माहिती वेबिनारद्वारे देण्यात येत आहे. 

हे देखील वाचा - बँड, बाजा, बारात अन् लॉकडाऊन

वेबिनारमध्ये मीना आकाशवाणी, सह्याद्री वाहिनी, बालभारती, गली गली सीम सीम, दीक्षा अॕप, मिसकाॕलद्वारे अध्ययन अशा विविध शैक्षणिक साधनांच्या वापराविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये वाजेगाव केंद्रातील सर्व पदोन्नत मुख्याध्यापक, प्राचार्य, पदवीधर शिक्षक तसेच सर्व शिक्षक सहभागी झाले होते. वाजेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापराविषयी सविस्तर माहिती सांगितली.  तंत्रस्नेही शिक्षिका रूपाली गोजवडकर, अक्षय ढोके यांनी आयोजनामध्ये पुढाकार घेतला. 

विद्यार्थ्यांची जाणीव ठेवा
सर्वच शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना ‘आपल्या शिवाय दुसरे कोणीही नाही’ याची जाणीव ठेऊन प्रामाणिक प्रयत्न करून लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांना उपयुक्त असे शैक्षणिक अनुभव द्यावे.
- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी

loading image