esakal | भविष्य निर्वाह निधीचे उप कार्यालय नांदेड येथेच सुरु करावे- कास्ट्राईबची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परंतु निवृत्तीनंतर मात्र संबंधीत पैसे काढण्यासाठी किंवा कार्यकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालय नांदेडला सुरु करावे अशी मागणी कास्ट्राईब कल्याण महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद खॉजा दादामियाँ यांनी पालकमंंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

भविष्य निर्वाह निधीचे उप कार्यालय नांदेड येथेच सुरु करावे- कास्ट्राईबची मागणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - नांदेड जिल्हा हा कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या ठिकाणी विविध संस्थांत अनेक कामगार दैनंदिन काम करतात. अनेक संस्था भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाशी जोडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा भविष्य निर्वाह निधी (पी.एफ) हा संंबंधीत निर्वाह खात्यामध्ये जमा केला जातो. परंतु निवृत्तीनंतर मात्र संबंधीत पैसे काढण्यासाठी किंवा कार्यकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी कार्यालय नांदेडला सुरु करावे अशी मागणी कास्ट्राईब कल्याण महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद खॉजा दादामियाँ यांनी पालकमंंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.


मराठवाड्यात औरंगाबाद या ठिकाणी विभागीय पी.एफ. कार्यालय आहे. या पीएफ कार्यालयात संबंध जिल्ह्याचा कारभार औरंगाबाद येथूनच चालतो. पीएफ संबंधी कर्मचार्‍यांच्या अनेक अडचणी आणि त्रूटी असतात. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कामगारांना औरंगाबादला खेटे मारवे लागतात. शिवाय भविष्य निर्वाहासंबंधातील ज्या काही योजना आहेत. त्या योजनांची माहिती सामान्य कामगारांपर्यंत पोहचली जात नाही. त्यामुळे कामगारांना संबंधीत योजनेचा लाभ मिळत नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी संघटनेकडे चर्चेसाठी आल्या आहेत.

हेही वाचानांदेडचा हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर, कोणता ते वाचा?

भविष्य निर्वाह निधीचे उप कार्यालय नांदेडलाच करावे अशी मागणी

नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक संस्था, दुकाने, व्यवसायईक, ऊसतोड कामगार, लघुउद्योग इत्यादी संस्थांचे कारभार भविष्य निर्वाह निधीला जोडले आहेत. परंतु अनेकांचे भविष्य निर्वाह निधीतील राशी दिल्या जात नाहीत. त्या संबंधीच्या पावत्याही कामगारांपर्यंत पोहचत नाहीत. याबाबतचा पाठपुरावा करण्यासाठी नांदेड येथेच भविष्य निर्वाह निधीचे उप कार्यालय करण्यात यावे या संबंधीचे निवेदन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिले होते. परंतु त्यांना याबाबत पुन्हा स्मरण पत्र देवून भविष्य निर्वाह निधीचे उप कार्यालय नांदेडलाच करावे अशी मागणी करण्यात आली. याबाबतचा पाठपुरावा करुन नांदेडच्या संबंध कामगारांना न्याय द्यावा असे संघटनेचे सय्यद खाजा दादमियाँ, बरजोरसिंह गहेरवार, मोहनसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.