Success Story : भारतीय क्रिडा प्राधिकरणमध्ये नांदेडच्या कृतीका नरवाडेची निवड

file photo
file photo
Updated on

नांदेड : नांदेड पोलिस दलात कार्यरत असलेल्या रणजीत नरवाडे यांची मुलगी कृतीका (वय १३) हीची राष्ट्रीय स्तरावरील भारतीय क्रिडा प्रबोधीनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झाली आहे. तीने यापूर्वी या क्रिडाक्षेत्रात राज्यस्तरीय तीन पारितोषक पटकावले आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील प्रशिक्षणासाठी ती औरंगाबाद येथे दाखल झाली आहे. 

येथील किरण स्पोर्ट असोसिशनमध्ये मागील पाच वर्षापासून जिमनँस्टीकचे प्रशिक्षण घेत होती. गुणवंत खेळाडु घडत असतांना सुख सुविधा, प्रगत प्रशिक्षकचा अभाव असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण मिळावे म्हणून भारतीय क्रिडा प्राधिकरणमध्ये निवड प्रक्रियामध्ये सहभाग नोंदवून केलेली उच्च कामगिरी लक्षात घेवुन पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. कोच रोहन गायकवाड, संतोष प्रधान व मार्गदर्शक श्री फुलारी यांनी कृतीकाच्या प्रशिक्षण साठी मेहनत घेतली.

जिम्नॅस्टीक क्रिडाक्षेत्रासाठी देशभरातून तीन प्रशिक्षण केंद्र कार्यान्वीत असून त्यापैकी औरंगाबाद येथे एक आहे. या ठिकाणी गुणी खेळाडूंना कठीण प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाते. कृतीका हिला शालेय जिवनापासूनच जिम्नॅस्टीक या खेळाचा छंद होता. तिचा छंद ओळखून पोलिस खात्यात असलेल्या वडिलांनाही तिला कुठलीही गरज भासु दिली नाही. तिनेही वडिलांच्या मेहनतीचे फळ मिळवून दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com