esakal | नांदेड जिल्ह्यात उचल परत करण्यावरून ऊसतोड मजुराचे अपहरण
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरण प्रकरण

नांदेड जिल्ह्यात उचल परत करण्यावरून ऊसतोड मजुराचे अपहरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ऊसतोडी पोटी घेतलेली अडीच लाखांची उचल परत देण्याच्या कारणावरून तरुणाचे अपहरण केल्याची घटना तामसा (ता. हदगाव, जि. नांदेड) येथे घडली. तामसा पोलिस ठाण्यात तसा गुन्हा दाखल झाला. पाथरड तांडा (ता. हदगाव) (Hadgaon) येथील कृष्णा भिकू जाधव (वय २८) याने ऊसतोडीसाठी सोलापूर (Crime In Nanded) जिल्ह्यातील माढा साखर कारखान्याचे मुकादम विठ्ठल मत्ता राठोड (रा. नांदा तांडा, ता. भोकर, जि. नांदेड) (Nanded) यांच्याकडून अडीच लाख उचल घेतली होती. उचल परत देण्याच्या कारणावरून संशयितांनी आठ सप्टेंबरला संगनमत करून कृष्णा भिकू जाधव याला पकडले. जबरदस्तीने जीपमध्ये बसवून अपहरण केले.

हेही वाचा: दारुसाठी पैसे न दिल्याने मित्राचा खून, औरंगाबादेतील घटना

त्याची आई शशिकलाबाई भिकू जाधव (वय ५५) यांनी रविवारी (ता. १२) दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फौजदार किरवले तपास करीत आहेत.

loading image
go to top