esakal | राज्यातील `या` जिल्ह्यात ऊसाचे फड दारुचे अड्डे
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

शुक्रवारी (ता. १५) सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. चक्क दारु विक्री करणारे अवैध दारु ऊसाच्या फडात नेऊन विक्री करत असल्याचे दिसून आले

राज्यातील `या` जिल्ह्यात ऊसाचे फड दारुचे अड्डे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात हातभट्टी व देशी दारु अवैध मार्गाने विक्री करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मुदखेड तालुक्यात शुक्रवारी (ता. १५) सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. चक्क दारु विक्री करणारे अवैध दारु ऊसाच्या फडात नेऊन विक्री करत असल्याचे दिसून आले. मात्र अवैध दारु विक्री करणाऱ्यांच्या गोरखधंद्यावर उत्पादन शुल्क विभागाने पाणी फेरले. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासह सर्वच शासकिय यंत्रणा कामाला लागली आहे. पोलिस बंदोबस्त कामी रस्त्यावर असल्याने अवैध धंदेवाल्यांचा जिल्हाभरात हैदोस सुरू आहे. मात्र देशी व हातभट्टी अवैध रित्या विक्री करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क करीत आहेत. या विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकांनी जिल्हाभरात धडक कारवाई सुरू केली आहे. नांदेड, मुदखेड, किनवट या तालुक्यात देशी दारु, हातभट्टी, शिंदी हे मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना अटक केली आहे. 

हेही वाचा Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह

आठवड्यातील तिसरी मोठी कारवाई

मागील आठवड्यात चिकाळा तांडा परिसरातून तब्बल ३२ आरोपीना अटक करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले होते. ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा या विभागाने मुदखेड तालुक्यात छापा टाकला. यावेळी देवळा तांडा आणि तारदळा तांडा या परिसरातून ताडी १३० लीटर, हातभट्टी ३० लीटर, रसायन १४१० लीटर आणि तीन दुचाकी असा सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी १२ आरोपींना अटक केली. परत शुक्रवारी (ता. १५) एका लाखाचा मुद्देमाल चिकाळा तांडा व माळकौठा परिसरातून जप्त केला. 

यांनी घेतले परिश्रम

सदर कार्यवाही मध्ये निरीक्षक एस. एस. खंडेराय, एस. एम. बोदमवाड, पी. ए. मुळे, दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, के. के. किरतवाड, आर. एस. कोतवाल, पी. बी. टकले, पी. जी. कदम, टी. बी. शेख, बी. एस. पडुळ, वाय. एस. लोळे, व्ही. टी. खिल्लारे, मो. रफी, श्रीमती कांबळे, श्री. सदावर्ते, अमोल शिंदे, जवान भोकरे, नारखेडे, आनकाडे राठोड, संगेवार, खतीब, जाधव, नांदुसेकर, भालेराव, दासरवर, सुरनर, फाळके, अब्बास पटेल, वाहन चालक संगेवार, जाधव, रावसाहेब बोदमवाड यांनी परिश्रम घेतले.