esakal | गुड न्यूज : सुकन्या समृद्धी खाते योजना आपल्या दारी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अभिनव सिन्हा डाक निरीक्षक किनवट उप विभाग किनवट आणि सुरेश सिंगेवार विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड.यांनी केले आहे.

गुड न्यूज : सुकन्या समृद्धी खाते योजना आपल्या दारी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : किनवट तालुक्यातील दहेगावं येथे lता. २१ सप्टेंबर २०२० रोजी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते योजना घरोघरी जाऊन शून्य ते दहा वर्षापर्येंतच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 परिसरातील खेड्या पाड्यातील व वाड्या तांड्यातील नागरिकांनी आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी,आणि UPSC, MPSC शिक्षणासाठी,लग्नासाठी व तिच्या उजवल भविष्या करिता सुकन्या समृद्धी खाते योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अभिनव सिन्हा, डाक निरीक्षक किनवट उप विभाग किनवट आणि सुरेश सिंगेवार विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड यांनी केले आहे.

हेही वाचा - Video- गोदावरीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे उघडले सहा दरवाजे

समृद्धी खाते योजनाच्या मुख्यधारेला जोडन्याचे डाक विभाग करणार

ही योजना भारत सरकार भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत गाव पातळीवर घरोघरी जाऊन विशेष अंतर ठेवून, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर वेळोवेळी वापर प्रत्येक खाते फॉर्म भरून घेताना करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना सुकन्या समृद्धी खाते योजनाच्या मुख्यधारेला जोडन्याचे डाक विभाग करणार आहे.

सुकन्या समृद्धी खाते योजनेला सर्वात जास्त व्याज व ते पण चक्रीवाढ

गावातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलींचे सुकन्या समृद्धी खाते या मोहिमेत सहभागी व्हावे व आपले गाव शंभर टक्के सुकन्या समृद्धि गाव म्हणून नांदेड जिल्ह्यात ओळखले जावे. भारत सरकारच्या वतीने सुकन्या समृद्धी खाते योजनेला सर्वात जास्त व्याज व ते पण चक्रीवाढ आहे.

येथे क्लिक करास्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी- उदय सामंत

250 रुपायात हे खाते घरपोच उघडून मिळेल.

दोनशे पनास रुपये हे आपल्या मुलींच्या खात्यात जमा रक्कम राहणार आहे. या सुकन्या समृद्धी खाते योजना मध्ये लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे घेऊन आपल्या घरीच हजर रहावे.

लागणारी कागदपत्रे:

१) मुलीचा जन्म तारखेचा दाखला. ग्रा.प.दाखला किंवा आधार कार्ड दोन्हीपैकी एक झेरॉक्स प्रत

२) मुलीचे दोन फोटो पासपोर्ट साईज.

३) आई किंवा वडिलांचे दोघापैकी एकाचे आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स. ज्याचे कागदपत्रे देणाऱ्याचे दोन फोटो.