esakal | दिवाळी साजरी करताना कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची काळजी घ्या- अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र जागतिक स्तरावरील उद्रेकाचे अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविडची दुसरी लाट आली आहे.

दिवाळी साजरी करताना कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची काळजी घ्या- अशोक चव्हाण

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी आरोग्य विभागाने कोविड आजाराच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत नागरिकांनी दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र जागतिक स्तरावरील उद्रेकाचे अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविडची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आपण दिवाळी साजरी करताना अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य दुसऱ्यालाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागासह इतर यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात एक हजार १९२ कोटींची कर्जमाफी -

राज्य शासनानेही सर्व संबंधितांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. औषधे, साधनसामग्री हा बफर स्टॉक म्हणून ठेवण्यात सांगितले आहे. मात्र नागरिकांनी दक्षता घेतल्यास संभाव्य धोका टळू शकतो. फटाक्यांच्या धुरामुळे रुग्णांना तसेच श्वसनास त्रास असणाऱ्या व्यक्तींचा त्रास वाढेल त्यामुळे फटाके विरहीत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या ठिकाणी किंवा समूहात असताना मास्कचा वापर करा. दोन व्यक्तीमध्ये शारीरिक अंतर राखा असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले आहे.

loading image
go to top