कोरोनावर मात करण्यासाठी आयुष काढा- अधीष्ठाता डाॅ. यशवंत पाटील

प्रल्हाद कांबळे
Saturday, 27 June 2020

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदापासून तयार करण्यात आलेला आयुष काढा घ्यावा असे आवाहन आयुर्वेद शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांनी केले आहे.

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वच जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मग ते होमियोपॅथीक, ॲलोपॅथीक किंवा आयुर्वेद औषधाची मागणी वाढली आहे. मात्र शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदापासून तयार करण्यात आलेला आयुष काढा घ्यावा असे आवाहन आयुर्वेद शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांनी केले आहे. ते मागील एक महिण्यापासून पंजाब भवन आणि एनआरआय यात्री निवास येथील कोवीड सेंटर व क्वारंटाईन रुग्णांना सकाळ संध्याकाळ हा काढा देत आहेत.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध देशभरात लॉकडाउन सुरु आहे. या लॉकडाउनमुळे बऱ्यापैकी या कोरोनाचा प्रतिबंध करता आला. हा आजार वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन आपल्या सर्व विभागाच्या प्रमुखांसोबत समन्वय ठेवून आहेत. पोलिस, आरोग्य, महसुल, महापालिका आणि कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध सामाजीक संघटना यांच्याशी ते समन्वय ठेवून आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच हा काढा तयार करण्यासाठी आर्थीक मदत देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - नांदेडकरांनो सावधान: कोरोना पाय पसरतोय, गर्दी टाळा

दीडशे मिली कोमट पाण्यात हा काढा

डॉ. पाटील यांनी आयुष काढ्याबद्दल त्यांनी माहिती दिली. हा काढा सकाळी उपाशी पोटी आणि सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास दीडशे मिली कोमट पाण्यात हा काढा देण्यात येतो. ता. दोन जूनपासून हा काढा यात्री निवास एनआरआय आणि पंजाब भवन येथील कोरोना बाधीत व क्वारंटाईन केलेल्या सर्व रुग्णांना देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना त्या काढ्याचा फायदा होत आहे. 

काय आहे काढ्यात

दालचिनी, सुंठ, काळी मीरी, काळे मनुका आणि तुळशीपत्र हे आयुर्वेदातील महत्वाचे घटक समाविष्ठ केले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ उष्ण द्रव्य आहे. या काढ्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेय या काढ्यामुळे गुजरात राज्यात जवळपास सहा हजार रुग्ण कोरोनावर मात करु शकल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

येथे क्लिक कराधक्कादायक : नांदेडचा ‘हा’ आमदार पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहचली ३४८ वर

रोगप्रतिकारक आयुर्वेद औषधाचे सेवन करावे

कोरोनाचा पराभव करायचा असेल तर नागरिकांनी रोगप्रतिकारक आयुर्वेद औषधाचे सेवन करावे असे आवाहन करत शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये. शारिरीक अंतर ठेवून बाहेर जबाबदारीने राहिले तरच कोरोनासारख्या गंभीर आजारावर आपणास मात करता येईल असे डॉ. यशवंत पाटील यांनी आवाहन केले.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take out AYUSH to overcome Corona Dr. Yashwant Patil nanded news