esakal | नांदेडात सोमवारी दहा जणांचा कोरोनाने मृत्यू, २९० जण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo


‘श्री’चे आगमन आणि महालक्ष्मी उत्सवानिमित्त बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. या दरम्यान अनेकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उलंघन करत मनसोक्त खरेदी केली. त्याचाच परिणाम मागील आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यातील विविध भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. 

नांदेडात सोमवारी दहा जणांचा कोरोनाने मृत्यू, २९० जण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. रविवारी (ता.३०) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी सोमवारी (ता.३१) एक हजार ३२८ अहवाल प्राप्त झाले. यात ९५९ निगेटिव्ह तर, २९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात १० कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दहा दिवसाच्या उपचारानंतर १८९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

‘श्रीं’च्या आगमन आणि महालक्ष्मी उत्सवामुळे बाजारात खरेदीसाठी उसळलेली गर्दी बघता अनेकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उलंघन करत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येते होते. त्याचाच परिणाम मागीत आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यातील विविध भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. रविवारी आरटीपीसीआर - ८३ व अँन्टीजन टेस्ट किटद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत २०७ असे एकूण सोमवारी २९० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या सहा हजार ७१५ वर जाऊन पोहचली आहे. 

हेही वाचा- नांदेडचे जिल्हाधिकारी थेट मुगाच्या खळ्यावर, कशासाटी? ते वाचाच

आतापर्यंत २२९ रुग्णांचा उपाचारादरम्यान मृत्यू

सोमवारी दिवसभरात वसंतनगर ताडा उमरी येथील पुरुष (वय ८५), पसूर ता. मुखेड पुरुष (वय ५२), हदगाव पुरुष (वय ८५), मुखेड महिला(वय ४५), मगनपूरा पुरुष (वय ६५), भोसी ता. भोकर पुरुष (वय ६६), तामसा ता. हदगाव पुरुष (वय ५६), गोकुळनगर नांदेड महिला (वय ६५), परवानानगर पुरुष (वय ६५), सावरगाव देगलूर पुरुष (वय ५५) असा दहा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २२९ रुग्णांचा उपाचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. 

२९० जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह 

आरटीपीसीआर व अँन्टीजन या तपासणीतून सोमवारी नांदेड वाघाळा महापालिका हद्दीत -१९४, नांदेड ग्रामीण- २८, देगलूर-दोन, माहूर-दोन, लोहा-नऊ, नायगाव- १३, कंधार-तीन, अर्धापूर-दोन, मुखेड-सहा, किनवट-नऊ, हदगाव-दोन, मुदखेड- १४, लातूर- एक, परभणी- एक, यवतमाळ- दोन, हिंगोली - दोन असे २९० जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा- डाॅक्टरची सामाजीक बांधिलकी : हे कुठले पर्यटनस्थळ नसून प्राथमीक आरोग्य केंद्र ​

२०६ रुग्णांची प्रकृती गंभीर 

तर विष्णुपुरी शासकीय रुग्णालय- नऊ, जिल्हा रुग्णालय -तीन, पंजाब भवन कोविड सेंटर- १०९, मुदखेड- ११, हदगाव-सहा, देगलूर-दोन, कंधार- तीन, किनवट- पाच, धर्मबाद- एक, मुखेड- ३१, माहूर-तीन व खासगी रुग्णालयातील - सहा असे एकूण १८९ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत चार हजार ५५८ जाणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी ३७४ स्वॅब अहवाल प्रलंबित होते, उपचार सुरू असलेल्या रुग्णापैकी २०६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोना मीटर- 
सोमवारी पॉझिटिव्ह - २९० 
मृत्यू- १० 
रुग्णालयातून सुटी- १८९ 
आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- सहा हजार ७१५ 
आतापर्यंत कोरोना मुक्त- चार हजार ५५८ 
आतापर्यंत एकूण मृत्यू- २२९ 
आतापर्यंत उपचार सुरू असलेले - १८८१ 
प्रलंबित स्वॅब अहवाल- ३७४ 
प्रकृती गंभीर - २०६