
शनिवारी (ता.२७) चार हजार २५७ अहवाल प्राप्त झाले. यामधील तीन हजार ६१ निगेटिव्ह तर एक हजार ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३८ हजार ५९८ इतकी झाली आहे.
नांदेडात कोरोना बाधितांच्या मृत्यूचे थैमान ; शनिवारी १६ जणांचा मृत्यू, एक हजार ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
नांदेड - मार्च महिना सुरु झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नवा उच्चांक गाठत आहे. तर दुसरीकडे मागील दोन दिवसांपासून मृत्यूच्या संख्येत देखील वरचेवर वाढ होत आहे. शुक्रवारी मृत्यू झालेली संख्या सर्वाधिक वाटत होती. परंतु शनिवारी (ता.२७) प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा मृत्यूचा दर वाढल्याने नांदेडात कोरोनाच्या मृत्यूचे जणू थैमान सुरु झाले आहे असे वाटत आहे.
शुक्रवारी (ता.२६) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शनिवारी (ता.२७) चार हजार २५७ अहवाल प्राप्त झाले. यामधील तीन हजार ६१ निगेटिव्ह तर एक हजार ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३८ हजार ५९८ इतकी झाली आहे. शनिवारी सिडको नांदेड महिला (वय ५५), लोहा पुरुष (वय ६०), तरोडा (बु.) पुरुष (वय ४०), विष्णूपुरी नांदेड पुरुष (वय ६७), मुदखेड पुरुष (वय ६५) या पाच बाधितावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात, आनंदनगर नांदेड महिला (वय ४२), पिरबुऱ्हाण नगर नांदेड पुरुष (वय ६५), गुलजारबाग नांदेड पुरुष (वय २८), वजिराबाद नांदेड महिला (वय ७२), आनंदनगर नांदेड महिला (वय ६५), दाताळ तालुका कंधार पुरुष (वय ५२) यासहा बाधितांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात गणेश टॉकीज जवळ नांदेड पुरुष (वय ६५) यांच्यावर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व पारंबा तालुका हिमायतनगर पुरुष (वय ७१) यांच्यावर हदगाव कोविड सेंटरमध्ये तर नांदेड महिला (वय ८०), माणिकनगर नांदेड पुरुष (वय ५०), गांधी चौक भोकर या तीन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वरील १६ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६९७ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- नांदेडमध्ये पुरेसे बेड उपलब्ध असून रुग्णांनी घाबरून जाऊ नये - जिल्हाधिकारी डॉ. विपीन
या ठिकाणी आढळले रुग्ण
शुक्रवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत - ५५४, नांदेड ग्रामीण -४४, लोहा -२५, कंधार -४७, मुदखेड -१४, बिलोली- ३५, हिमायतनगर - पाच, माहूर - ११, उमरी - ५४, देगलूर -३३, भोकर -३६, नायगाव -३४, धर्माबाद -१३, अर्धापूर -आठ, किनवट -३९, मुखेड - ९३, हदगाव -१८, परभणी - नऊ व बिदर - एक असे एक हजार ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
हेही वाचा- बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार; हदगाव तालुक्यातील ठाकरवाडी येथील घटना
१०८ बाधितांची प्रकृती गंभीर
शनिवारी दिवसभरात ६३८ कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २८ हजार ५१८ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या नऊ हजार १३४ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील १०८ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ४०९ स्वॅबची तपासणी सुरु होती.
Web Title: Thaman Death Corona Victims Nanded Saturday 16 People Died And 1073 People Tested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..