

Tehsildar Accident Nanded
sakal
अर्धापूर : नांदेड अर्धापूर रस्त्यावरील तहसील कार्यालयाच्या परिसरात ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने भरधाव ट्रॕक्टर तहसीलदाराच्या शासकीय वाहनावर येवून आदळ्याने अपघात झाला. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यासह त्यांचे कर्मचारी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तर तहसिलदारासह वाहनाचे चालक अरुण वाघमारे किरकोळ जखमी झाले तर महसूल कर्मचारी शेख सलीम यांचा पाय फॅक्चर झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (ता ३०) साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.