Nanded : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील मुलांना पोटभर जेवण देण्याऐवजी दमदाटी करुन धमकावणाऱ्याची हकालपट्टी

वसतिगृहातील मुलांना पोटभर जेवण न देणे भोवले
nanded
nandedsakal

नायगाव : येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील मुलांना पोटभर जेवण देण्याऐवजी दमदाटी करुन धमकावण्याचा प्रकार रविवारी घडला होता. या प्रकरणाचा बोभाटा होताच जेवण पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची हकालपट्टी करुन पर्यायी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी राजेश मिनगीरे यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने नायगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी सहावी ते १० वी पर्यंतचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात १७७ मुले वास्तव्यास आहेत. या मुलांना जेवण पुरवठा करण्यासाठीचे मुळ कंत्राट ब्रिक्स या कंपणीला देण्यात आले आहे, मात्र सदर कंपणीच्यावतीने रवी भोकरे हा जेवण पुरवण्याचे काम करत होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून वसतिगृहातील मुलांना व्यवस्थित जेवण देत नव्हता. याबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्या होत्या. अधिक्षकांनीही व्यवस्थित व पोटभर जेवण देण्यासाठी वेळोवेळी कंत्राटदाराला सुचना दिल्या पण काहीही फरक पडला नाही उलट अधिक्षकालाच दमदाटी करत होता.

अधिकारी तातडीने हजर

वसतिगृहातील बोभाटा जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यापर्यंत पोचल्यावर त्यांनी तातडीने दोन अधिकारी पाठवले व स्वतः जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेश मिनगिरे नायगावला आले. त्यांनी मुलांशी संवाद साधला व झालेला प्रकार समजून घेतला. मुलांनी जेवण पुरवणारे रवी भोकरे यांच्या विरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला व यांच्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याचे निदर्शनास आणून दिले.

ब्रिक्सच्यावतीने वसतिगृहातील मुलांना जेवण पुरवठा करणाऱ्या रवी भोकरे यांच्या दहशतीमुळे मुले तणावाखाली होते. पण रविवारच्या प्रकारानंतर त्यांची हकालपट्टी केल्यामुळे मुलांनी समाधान व्यक्त केले.

- रमेश चव्हाण, अधिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com