esakal | माहूरच्या मुस्लिम समाजाचा आदर्श पायंडा; सर्वधर्मीयांना अन्नधान्याचे वाटप; कोविड सेंटरला चार कुलरही दिले भेट!

बोलून बातमी शोधा

धान्य वाटप
माहूरच्या मुस्लिम समाजाचा आदर्श पायंडा; सर्वधर्मीयांना अन्नधान्याचे वाटप; कोविड सेंटरला चार कुलरही दिले भेट!
sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : जात- पात, धर्म- भेद बाजूला ठेवून कोरोना महामारीच्या काळात वसुधैव कुटुंबकं" या उक्तीप्रमाणे माहूरच्या मुस्लिम समाजाने पवित्र रमजान महिन्यात जकातच्या रक्कमेतून सर्व धर्मीय दोनशे गरीब गरजू कुटुंबांना अन्नधान्याची किट व कोविड केअर सेंटरसाठी चार कुलर भेट देऊन मुस्लिम समाजाने समाजात आदर्श पायंडा पडला असल्याचे मत तहसीलदार राकेश गिड्डे यांनी व्यक्त केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी ( ता. एक ) मे महाराष्ट्र दिनी माहूर येथील जामा मस्जिद कमेटीकडून गरजूंना अन्नधान्य व कोविड केअर सेंटरला चार कुलर भेट देण्याचा सोशल डिस्टंसिंग पाळत आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राकेश गिड्डे, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे, पोलिस निरीक्षक नामदेव रिठे, बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल सिंह चौहान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, डॉ. अभिजित आंबेकर, मंडळ अधिकारी श्री. पडकोंडे, उद्योजक बाबुलाल जैस्वाल, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - बिबट्या मृत्यूप्रकरण : दोषीविरुद्ध कारवाई थंड; वन्य प्राणी मित्रांकडून संताप

या वेळी पुढे बोलतांना तहसीलदार राकेश गिड्डे यांनी प्रशासनाला काम करीत असताना जनतेचा सहकार्य आवश्यक असते. माहूर शहरातील तमाम जनता ही शांतताप्रिय असून मुस्लिम धर्मियांनी गत वर्षीही मालेगाव काढा, इम्मुनिटी बूस्टर वाढवणाऱ्या होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बम थर्टीच्या गोळ्या व अन्नधान्य वाटप केले होते. यावर्षीसुद्धा तसाच उपक्रम राबवून मुस्लिम समाजाने शहरात जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशात एक चांगला संदेश दिला आहे. असे तहसीलदार गिड्डे यांनी सांगितले.

तर गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना एकोप्याने करण्याची गरज असून एकत्र आले तर या रोगाचा प्रसार होईल मात्र एकोप्याने अर्थात विचाराची एकता असल्यास यावर नक्कीच मात देता येईल. लढाई ही केवळ हत्याराने लढायची नसते कधी कधी बचावात्मक लढाई सुद्धा खूप मोठा विजय मिळवून देते. त्यामुळे नागरिकांनी स्वतः च आरोग्य जपावं, शासनाच्या त्रिसुत्रीचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान यांनी कोरोना संसर्ग कायमचा या देशातून पळवून लावायच असल्यास लसीकरण हे एकमेव पर्याय असून प्रत्येक समाज बांधवांनीया साठी डोर टू डोर जाऊन नागरिकांच्या मनातील भीती काढणे गरजेचे असल्याचे सांगत मुस्लिम समाजाने त्या साठी स्पेशल कॅम्प लाऊन ऑनलाईन नोंदणी साठी पुढे यावे असे ते म्हणाले. पत्रकार नंदू संतान यांनी सर्वधर्मीय मंदिर, मज्जिद, गुरुद्वारा या संस्थांनी पुढे येऊन आरोग्य सेवा आर्थिक हातभार लावण्यासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले. याची सुरुवात माहूर येथील संस्थांमधून झाल्यास सोन्या पेक्षा पिवढे होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रास्ताविकातून मुस्लीम जमातचे आमिर मो. आरिफ बावानी यांनी प्रशासनाला प्रत्येक संभव मदत करण्याचे आश्वासन देत ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भेट देण्यासाठी ही सकारात्मकता दाखविली. कार्यक्रमाचे संचलन साजीद खान यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी मानले. यावेळी हाजी उस्मान खान चांद खान, बाबू खान फारुकी, हाजी रऊफ सेठ सौदागर, नगरसेवक रहेमत आली, रफिक सौदागर, इकबाल फाजलानी, जामा मस्जिदचे सदर नासिर सौदागर, रफिक भाई सौदागर, इखलास फाजलानी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर प्रातिनिधिक स्वरुपात गरजूंना अन्नधान्याचे किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार राकेश गिड्डे व इतर मान्यवरांनी मुस्लिम जमात चे आमीर मो. आरिफ बावानी यांचा सत्कार करुन आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे