नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Law&Order
नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

नांदेड : शहर व जिल्ह्यामध्ये खाकीचा धाक कमी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा(law and order) प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या शहर व जिल्ह्यात जबरी चोऱ्या, मारहाण, खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार यांसारख्या (nanded crime news )घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असून, सर्वजण दहशतीखाली वावरत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यामध्ये भरदिवसा पैशांची बॅग लिफ्टिंग, खून, जबरी चोरी, अल्पवयीन मुलींना पळवणे, विवाहितांचा छळ, शासकीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मारहाण, घरफोडी आदी घटना पोलिसांचा धाक कमी झाल्याने सर्रासपणे घडत आहेत. चोरट्यांनी डोके वर काढल्याने सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांमध्येही धास्ती भरली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारखे नांदेड जिल्हा क्राईममध्ये नावारुपाला येते की काय? अशी शंका दृढ होत चालली आहे.

हेही वाचा: नांदेड : शिक्षणसेवक पदभरतीची गहाळ संचिका अखेर सापडली

किरकोळ कारणावरून होतात खून

अगदी क्षुल्लक कारणावरून मारहाण करून खून करण्याचे(murder) प्रकार घडत असताना, पोलिस मात्र तपासकामी कमी पडत असल्याचे दिसत आहे. नांदेड शहरामध्ये पंधरा दिवसात दोन खून झाले आहेत. मुरमुरा गल्ली आणि शारदानगर येथे क्षुल्लक कारणावरून तरुणांना जीव गमवावा लागला आहे. विशेष आरोपी हे २० ते २५ वयोगटातीलच आहेत.

हेही वाचा: आजीला बांधून केली मारहाण; दीड लाखांचा ऐवज लंपास

कोरोनासह जबरी चोरीचा धाक

शहरामध्ये भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबतच जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचाही धाक पडला आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक, खरेदीसाठी जातांना जीव मुठीत धरूनच सर्वसामान्यांना बाहेर पडावे लागत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top