Nanded : प्रेमसंबंध जुळवून नंतर लग्नास नकार दिल्याने तरुणाने जिवन संपवले

रमनवाडीतांडा येथील घटना; गुन्हा नोंद
nanded
nandedsakal

हिमायतनगर, ता.१४ (बातमीदार) : प्रेमसंबंध जुळवून नंतर लग्नास नकार दिल्याने तरुणींनी ओढणीने गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली. मृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटना गुरुवारी (ता.११) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

हिमायतनगर तालुक्यातील रमनवाडी तांडा येथील आरोपी पवन उर्फ राजू सुभाष आडे याने गावातीलच एका युवतीसोबत प्रेमसंबंध जुळविले. काही दिवस तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करून नंतर दुसऱ्याच मुलीसोबत सोयरीक जुळवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, ही तरुणी काही दिवसांपासून तणावपूर्ण जीवन जगत होती.

अखेर फसवणूकीस व आरोपीच्या धमक्यांना कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मृत मुलीचे वडील सुदाम श्यामराव जाधव यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत आरोपी माझ्या मुलीची फसवणूक करून तिला वारंवार फोनद्वारे मानसिक त्रास देत होता. मुलांचे वडील ही तुम्ही भिकारडे आहात.

तुमची आमची सोयरीक कशी जुळेल म्हणून हिनवत होते. तुझ्या मुलीला भरदिवसा फुकून देतो, अशी आरोपी सातत्याने धमकी देत होता. त्यामुळे या लोकांच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे. हेच लोक माझ्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, असे फिर्यादीत नमुद केले. फिर्यादी सुदाम श्यामराव जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी पवन उर्फ राजू सुदाम आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे, सोनू दिलीप आडे यांच्याविरुद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com