नांदेडात ‘हे’ आहेत कंटेनमेंट झोन... वाचा

फोटो
फोटो

नांदेड : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तिसऱ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. यानंतर जिल्ह्यासह परिसरात कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लॉकडाऊनचा पहिल्या टप्प्यात एकही रुग्ण आढळला नाही. मात्र दुसऱ्या टप्याच्या शेवटी शहरात कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत गेला. ज्या भागातील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले त्या परिसराला कंटेन्टमेन्ट झोन जाहीर करुन त्या परिसराला सील करण्यात आले. शहरात एका मागोमाग चक्क चार कन्टेनमेन्ट जाहीर करण्यात आले. 

पहिला कंन्टेंमेन्ट झोन पिरबुऱ्हाननगर भाग 


पिरबुऱ्हाणनगर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. मात्र त्याचा स्त्रोत प्रशासनाला अजूनही शोधता आला नाही. शेवटी तो रुग्ण मरण पावला. आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. पहिला रुग्ण सापडल्यानंतर पिरबुऱ्हाणनगर परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला. या भागातील प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली. 

अबचलनगर

त्यानंतर येथील भाविकांना पंजाबमध्ये सोडण्यासाठी गेलेल्या अबचलनगर भागातील एका चालकाला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर अबचलनगर गुरुद्वारा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांची कसुन तपासणी करण्यात येत असताना पुन्हा या चालकासोबत गेलेल्या तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यात एकजण सांगवी परिसरातील अंबानगरलाही कंटेन्मेन्ट झोन जाहीर करण्यात आला असून सील करण्यात आला. 

अंबानगर आणि लंगरसाहिब गुरूद्वारा परिसर

लंगरसाहिब गुरुद्वारामधील ९७ सेवादारांचा (कर्मचारी) यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत तब्बल २० सेवादार कोरोनाबाधीत सापडले. त्यानतंर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले. विशेष म्हणजे या सर्वांना शोधून पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यातील अजनीह चार जण बेपत्ता आहेत. त्यानंतर लंगरसाहिब आणि गुरूद्वारा परिसर कन्टेनमेन्ट जाहीर करण्यात आला. 

देगलूरनाका परिसरातील रहमतनगर

रविवारी सकाळी काही जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला देगलुर नाका परिसरातील रहमतनगर येथील होती. तिच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रशासन या परिसराची पाहणी व तिच्या नातेवाईकांची तपासणी करत असतांना त्या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर हा परिसरही कन्टेनमेन्ट जाहीर करण्यात आला. 

कोरोनाचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव

उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर पोलिसांनी आतापर्यंत सुमारे एक हजार वाहने जप्त करून विनापरवाना रस्त्यावर येणाऱ्या असंख्य लोकांवर कारवाई केली आहे. मात्र नागरिक अजूनही याबाबत गंभीर दिसत नाहीत. कोरोनाचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव, रुग्ण संख्येत वाढ त्यामुळे आता प्रशासनाला कठोर व्हावे लागणार आहे. सध्या शहरातील देगलूरनाका रहेमतनगर, पिरबुऱ्हाननगर, सांगवीतील अंबानगर, लंगरसाहिब आणि अबचलनगर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला.
 
आरोग्य पथकांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू

या भागात आरोग्य पथकांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आली असली तरी गर्दी न करता सुरक्षित अंतर राखून तोंडाला मास्क बांधून बाहेर पडणे गरजेचे आहे. परंतु अजूनही काही नागरिकांच्या लक्षात आलेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासन व नागरिकात वाद होत आहेत. कोरोनाला हटविण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या वतीने वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com