‘त्या’ आदेशाने तळीराम हिरमुसले

file photo
file photo

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यात भारतातही तिसरा लॉकडाउन जाहिर झाला. मात्र तिसरा लॉकडाउन जाहिर करतेवेळेस काही भागातील दुकानांना उघडण्यासाठी सवलत देण्यात आली. त्यात महत्वाचे म्हणजे तिन्ही प्रतिबंधीत क्षेत्रात मद्यांची दुकाने सुरू करण्यास अटी व शर्थीवर परवानगी दिली. मात्र शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत जिल्ह्यातील लॉकडाउन शिथील करण्यात आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन महिण्यापासून दारु दुकाने उघडण्याची वाट पाहणाऱ्या तळीरामांचा पुरता हिरमोड झाला आहे. 

नांदेड जिल्हा व शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सुरूवातीपासूनच सतर्क होते. लॉकडाउनच्या काळात पोलिस, आरोग्य व अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या सर्व संस्था अतिशय जोखमीने काम करत होती. मात्र पिरबुऱ्हाननगरमधील एक ६४ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधीत आढळल्याने मात्र सर्वांचे धाबे दणाणले. त्यानंतर दोन दिवस पुन्हा लॉकडाउन कडक करण्यात आला. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील महिला कोरोना बाधीत आल्याचे निष्पन्न झाले व या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांनंतर रुग्न संख्या वाढत गेली आज ही संख्या ३१ वर पोहचली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचा आदेश
 
तर तिकडे राज्यशासनाने महसुल मिळावा म्हणून मद्यांच्या दुनाकांना सुरू करण्यासाठी परवानगी दिली. ही परवानगी नांदेडसाठीही असली तरी जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने तुर्त तरी राज्यशासनाच्या सुचनांचा आदर करत जिल्ह्यातील मद्याची दुकाने मात्र बंदच राहणार आहेत. कुठलीच आस्थापना सुरू होणार नाही. याची खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यावी असा संदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिला आहे. 

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या तळीरामांना घाम

सोमवारपासून मद्याची दुकाने सुरू होणार असल्याने दुकानमालकांसह तळीराममध्ये आनंद ओसंजडून वाहत होता. लॉकडाउनमध्ये चढ्या दराने दारु खरेदी करुन आपला शोक पुरविणारी मंडळी पैसे संपल्यानंतर हतबल झाली. काळ्या बाजारात दारुचे दर गगणाला भिडले होते. ते दर अनेकांना परवडणारे नव्हते. सोमवारपासून (ता. चार) दुकान सुरू होणार असे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या तळीरामांना जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने मात्र चांगलाच घाम फोडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com