नांदेड - आजार कुठलाही असो, तो गंभीर स्वरुप धारण करण्यापूर्वीच त्यावर योग्य निदान करणे गरजेचे असते. सध्या स्किझोफ्रेनिया नावाच्या आजाराने लॉकडाउननंतर चांगलेच डोके वर काढले आहे. हा आजार म्हणजे स्वतः आणि इतरांचा सुड उगवणारा असाच आजार आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवेसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाउननंतर अनेकांच्या उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. हजारोंच्या नोकऱ्यांवर गदा आली. कुटुंब उघड्यावर आले. डोक्यावर कर्जाचा बोझा वाढल्याने अनेकांची निंद्रा नाश झाल्याने व लॉकडाउन दरम्यान अनेक स्किझोफ्रेनिया आजारी रुग्णांच्या आजाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जिल्ह्यात स्किझोफ्रेनिया आजारी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हेही वाचा- नांदेड : सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर खंजीर ठेवून सराफा दुकान फोडले; सहा लाखावर ऐवज लंपास, चोऱ्यांची मालिका थांबेना दिवसाला ७० च्या जवळपास बाह्यरुग्ण विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात स्किझोफ्रेनिया आजारावर मोफत उपचार केले जातात. सध्या दिवसाला ७० च्या जवळपास बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी तीस जणांना स्किझोफ्रेनिया आजाराची तीव्र लक्षणे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर यांनी सांगितले. त्यापैकी दहामधील सहा रुग्णास स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रासले आहे. स्किझोफ्रेनिया आजारी रुग्णास नियमित उपचाराची गरज स्किझोफ्रेनिया आजाराची तिव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या शहरातील खासगी रुग्णांलयात देखील संख्या वाढली असल्याचे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरानी म्हटले आहे. त्यामुळे स्किझोफ्रेनिया आजारी रुग्णास मानसिक आधाराची खरी गरज असून, समाजात वावरताना अशा रुग्णांना समजुन घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे स्किझोफ्रेनिया आजाराच्या रुग्णास नियमित उपचार केल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकते. हेही वाचा- केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने विकण्याची वेळ आली- पालकमंत्री अशोक चव्हाण काय आहेत लक्षणे स्किझोफ्रेनिया आजाराची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कानात आवाज आल्याचा भास होणे, चांगल्याचा वस्तुंची नासधुस करणे, आसपासच्या लोकांना त्रास देणे, नुकसान करणे, त्यांना इजा पोहचवणे या सोबतच स्वतःचे देखील नुकसान करुन घेणे इतकेच नव्हे, तर स्वतः मनात आत्महत्या करण्याचा विचार घेणे, या शिवाय शरिराचा एखादा महत्वाचा अवयव कापुन तो शरिरापासून वेगळा करण्यापर्यंत हे रुग्णांची हिम्मत होते. शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार लॉकडाउनपूर्वी स्किझोफ्रेनिया आजाराची रुग्ण संख्येचे प्रमाण कमी होते. मात्र, लॉकडाउनदरम्यान स्किझोफ्रेनिया आजारी रुग्णाकडे दुर्लक्ष होत गेल्याने व मानसिक ताणतणावामुळे स्किझोफ्रेनिया रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दहा पैकी सहा रुग्ण या आजाराचे शिकार होत आहेत. अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार सुविधा आहे. - डॉ. प्रदीप बोडके, वैद्यकीय उपाधीक्षक तथा विभाग प्रमुख मनोविकार शास्त्र. |