शिक्षणाचे बाजारीकरण रोखल्याशिवाय क्रांती नाही - जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी

Nanded News
Nanded News

नांदेड - शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते कायम ठेवण्यासाठी एक दुवा म्हणून सुरेश सावंत यांच्यासारखे लेखक काम करतात. सध्या गल्लोगल्ली नाणे गुरुजी मोठ्या प्रमाणात आहेत. अशा रुगुजींना रोखण्यासाठी प्राचार्य सुरेश सावंत यांच्या सारख्या शिक्षकांनी पुढे येणे गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ विचारवंत, जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांचा हिरकमहोत्सवानिमित्त रविवारी (ता. सात) सत्कार करण्यात आला. यावेळी गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, प्रमुख पाहुणे जनसंपर्क तज्ज्ञ तथा हैद्राबादच्या हिंदी प्रचार सभेचे परीक्षा मंत्री प्रा. सुरेश पुरी, राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, 'सकाळ' चे पत्रकार संदीप काळे, प्रा. सुरेश सावंत, राम शेवडीकर उपस्थित होते.

'सख्ख्या बहिणी पक्क्या मैत्रिणो या पुस्तकांचेही प्रकाशन

पत्रकार संदीप काळे यांनी संपादीत केलेले डॉ. सावंत यांच्याविषयीच्या ‘आचार्य’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन झाले. तसेच डॉ. सुरेश सावंत लिखित 'अक्षरयात्री'. 'नदी रुसली, नदी हसली' या ग्रंथांचे तसेच डॉ. मथु सावंत लिखित ‘अधोरेखित’ या ग्रंथाचे, तर आघाडीचे संवेदनशील युवा पत्रकार संदीप काळे यांच्या 'सख्ख्या बहिणी पक्क्या मैत्रिणो या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. प्रा. सुरेश सावंत हीरकमहोत्सव समिच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवलेखकांच्या पुस्तकास डॉ. सावंत यांची प्रस्तावना

एकंदरीतच शिक्षण, लेखन, साहित्य, संपादन अशा चौफेर क्षेत्रात गुणवत्तापूर्ण दबदबा डॉ. सुरेश सावंत यांनी निर्माण केला आहे, अशा प्रतिक्रिया उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या. डॉ. सावंत यांची ४० हन अधिक ग्रंथसंपदा असून त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे तसेच साहित्य संस्थांचे मानाचे शेकडो पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्यातील कित्येक प्रस्थापित आणि नवलेखकांच्या पुस्तकांच्या डॉ. सावंत यांनी प्रस्तावना लिहिल्या असून पाठराखणही केली आहे. डॉ. सार्वंत

डॉ. सुरेश सावंत यांचा हीरकमहोत्सवानिमित्त समितीच्या वतीने मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. यापूर्वी त्यांना  राज्यभरातील अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले असून, नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. नरहर कुरुंदकर पुरस्काराने त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com