esakal | दुचाकी व जबरी चोरी करणारे चोरटे जेरबंद; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड कारवाई

दुचाकी व जबरी चोरी करणारे चोरटे जेरबंद; नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या वेगवेगळ्या भागात जबरी चोरी व दुचाकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळेंच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्त सुरु केली. या दरम्यान जबरी चोरी व दुचाकी चोरी करणाऱ्या चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल शुक्रवारी (ता. ११) जप्त केला आहे. संबंधीत पोलिस ठाण्याच्या अभिलेखावर असलेल्या चोरट्यांना त्या- त्या पोलिसांच्या स्वाधीन केले.

शहराच्या शिवाजीनगर, इतवारा, विमानतळ या ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी व दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक द्वारकादस चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त घालत होते. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून चार चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा - पिंपरी चिंचवडमधून भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला ऋतुराज पहिला खेळाडू

शिवाजीनगर, इतवारा आणि विमानतळ ठाण्यात होते गुन्हे दाखल

शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत ता. 16 मे रोजी नवनाथ भारती यास मराठा बारजवळ तलवारीचा धाक दाखवून 700 रुपये आणि एक मोबाईल चोरण्यात आला होता. ता. पाच जून रोजी पोलिस ठाणे विमानतळच्या हद्दीत सकोजीनगर येथे मुन्ना ठाकूरला पिस्तुलचा धाक दाखवून त्याचा बकरा बळजबरीने चोरण्यात आला होता. ता. चार जून रोजी चौफाळा भागातील बजरंग बाबूराव जोंधळे हे घरात झोपले असतांना त्यांच्या घरातील मोबाईल चोरला. ता. सात जून रोजी मोहम्मद मोईन कुरेशी यांची दुचाकी चोरीला गेली होती.

हे आहेत चोरटे

या गुन्ह्यांच्या संदर्भाने समांतर तपास करतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार या सर्व चोऱ्या करण्यामध्ये तेजपालसिंघ कुलवंतसिंघ चाहेल ( वय 28) रा. जुना कौठा, सुरजसिंह कल्याणसिंह ठाकूर (वय 30) रा. चिरागल्ली नांदेड, शेख जुबेर शेख कदीर (वय 19) रा. आलिम स्कुलजवळ, वाजेगाव आणि शोयब खान शब्बीर खान (वय 20) रा. दारलूम वाजेगाव या चौघांचा सहभाग होता. हे सर्व चोरटे वाजेगाव परिसरात असल्याची खबर मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यांना पकडले. चोरट्यांनी वर उल्लेखीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

येथे क्लिक करा - नांदेड शहराच्या होळी भागातील व नुकतेच कर्नलपदी विराजमान झालेले मुकुंद माधवराव सरसर यांच्या पदोन्नतीमुळे नांदेडचे नाव देशपातळीवर कोरल्या गेले.

पथकातील या कर्मचाऱ्यांचे केले वरिष्ठांनी कौतूक

पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी चोरट्यांना पकडणाऱ्या पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, पोलिस अंमलदार सलीम बेग, जसवंतसिंघ शाहु, मारोती तेलंगे, बालाजी तेलंग, रवि दासरवाड, विलास कदम, गणेश धुमाळ, विठ्ठल शेळके, हेमंत बिचकेवार, मोतीराम पवार, तानाजी येळगे, कलीम आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचे कौतुक केले आहे.

loading image
go to top