esakal | नांदेड जिल्ह्यातील हे गाव 'कोव्हॅक्सिन' लसीकरणात प्रथम; जिल्हाधिकारी, खासदारांची भेट

बोलून बातमी शोधा

लसीकरण
नांदेड जिल्ह्यातील हे गाव 'कोव्हॅक्सिन' लसीकरणात प्रथम; जिल्हाधिकारी, खासदारांची भेट
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नायगांव तालुक्यातील आदर्श गांव शेळगांव ( गौरी ) गावातील जनतेने १०० टक्के कोरोना लसीकरण घेतल्याबद्दल नांदेड जिल्ह्यात या ग्रामपंचायतने पहिले स्थान मिळविले आहे. सध्या कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. मात्र, या चिंतेच्या वातावरणात कोव्हॅक्सिन लस सर्वांत प्रभावी असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

शेळगांव ( गौरी ) गावातील ४५ वर्षांवरील व्यक्तींनी कोरोना लस देण्याचे नियोजन प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच प्राचार्य डाँ. मनोहर तोटरे, उपसरपंच शालीनी राजेन्द्र पाटील, ग्रामविकास अधिकार धनराज कत्ते, तलाठी विजय पाटील यानी अथक परिश्रम घेऊन गावात जनजागृती मोहिम काढुन नागरिकांना ही लस किती महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले आहे.

हेही वाचा - ही ऐतिहासिक वास्तू जॉन स्मिथने जगासमोर आणली होती

शेळगांव ( गौरी ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात या शिबीराचे ता. तीन व ता. चार एप्रिल तर ता. १९ एप्रिल व ता. २३ एप्रिल अश्या चार ठप्यात संपूर्ण गावातील वय 45 च्या समोरील व्यक्ती लशीशिवाय एकही शिल्लक राहिली नाही. तर गावातील एकुण ५७० नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. या मोहिमेत ग्रामपंचायतचे सदस्य माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार, सुमित्राबाई पाटील, केशव शिंपाळे, प्रा.समदानी सय्यद, शिला वाघमारे, आशा इबितदार,संगिता कांबळे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनिल रामदासी यांच्यासह आदीनी योगदान दिल्याबद्दल समस्त गाववाल्याचे सरपंच तोटरे व उपसरपंच शालीनी पाटील यानी आभार व्यक्त केले.

शेळगांव ( गौरी ) येथे कोरोना लस शिबीर चालु आसताना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी भेट देऊन ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आज जिल्ह्यात हे गांव प्रथम क्रमांकावर असल्याने अभिनंदन केले. तसेच खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनाश घाटे व नायगांव येथील तहसिलदार गजानन शिंदे, भाजपचे शिवराज पा. होट्टाळकर, श्रावण पा. भिलवंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र पाटील भिलवंडे, राष्टवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर पा. भिलवंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी पा. भिलवंडे, जि. प. सदस्य माणिक लोहगावे राजकीय, सामाजिक व पत्रकार यांनी गावाचे अभिनंदन केले.